Indias Flop Film Superhit In Pakistan: सध्या, रणवीर सिंह (Ranveer Singh), अक्षय खन्ना (Akshaye Khanna), अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन आणि सारा अर्जुन अभिनीत 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पाकिस्तानमध्ये बंदी असूनही, 'धुरंधर' 20 लाखांहून अधिक वेळा बेकायदेशीरपणे डाऊनलोड झालाय, ज्यामुळे तो गेल्या 20 वर्षांत पाकिस्तानमध्ये सर्वाधिक पाहिलेला पायरेटेड बॉलिवूड चित्रपट बनला आहे. दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं पाकिस्तानमध्ये पाहिलेल्या टॉप 10 चित्रपटांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये चार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. एवढंच काय तर, भारतीय चित्रपट देखील पहिल्या क्रमांकावर आहे.  

रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'द गर्लफ्रेंड' (The Girlfriend) हा चित्रपट पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. तेलुगू आणि हिंदीसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा भारतातील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.पण, ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या धुमाकूळ घालतोय. महत्त्वाची बाब म्हणजे, हा सिनेमा केवळ भारतातच नाही तर, पाकिस्तानमध्येही मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. 7 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट पाकिस्तानमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट बनला आहे, जो पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय.

पाकिस्तानात नंबर 1 वर रश्मिकाची फिल्म (Rashmika Mandanna Film Number 1 In Pakistan)

नेटफ्लिक्सवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 'द गर्लफ्रेंड' पाकिस्तानात ओटीटी प्लॅटफॉर्म नंबर 1 वर ट्रेंड करतोय. या फिल्ममध्ये रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे आणि तिच्यासोबत दीक्षित शेट्टी आणि अनु इमॅनुएल यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. राहुल रवींद्रन दिग्दर्शित हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 11.3 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 6 कोटी आणि जगभरात 27.75 कोटी कमावले.

रश्मिकाच्या सिनेमाची कथा नेमकी काय? 

'द गर्लफ्रेंड' ही कथा भूमा नावाच्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीभोवती फिरते, जी स्वतःला विक्रम नावाच्या एका नियंत्रित पुरुषाशी संबंधात सापडते. भूमा ही एक लाजाळू मुलगी आहे, जी नेहमीच तिचा प्रियकर जे सांगेन ते ऐकते. दरम्यान, त्यानंतर तिची हळूहळू त्या नात्यात घुसमट होऊ लागते, ती स्वतःला शोधू लागते आणि त्या नात्यातून मोकळी होण्याचा प्रयत्न करते. सिनेमाची कथा मानसिक पैलूंनाही खोलवर स्पर्श करते. रश्मिका मंदाना भूमाची भूमिका करते, तर अनु इमॅन्युएल दुर्गाची भूमिका देखील उत्कृष्ट करते. विक्रमच्या भूमिकेत धीक्षित शेट्टी, प्रोफेसर सुधीरच्या भूमिकेत राहुल रवींद्रन, विक्कीच्या आईच्या भूमिकेत रोहिणी मोलेती आणि भूमाच्या वडिलांच्या भूमिकेत राव रमेश हे कलाकार देखील या चित्रपटाचा भाग आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Will Govinda Have Cameo In Avatar 3? 'अवतार 3'मध्ये गोविंदाचा कॅमिओ? सोशल मीडियावर व्हायरल होतोय VIDEO, काय खरं, काय खोटं?