Nora Fatehi Marriage: 'दिलबर', 'साकी-साकी' आणि 'कुसू - कुसू' सारख्या गाण्यांनी (Nora fatehi) लोकप्रियता मिळवलेली नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले आहे. तिनं आतंरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचे बरेच गाणे सुपरहिट झाले आहे. नोरानं अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. दरम्यान, नोरा एका वेगळ्याच कारणासाठी प्रकाशझोतात आली आहे. आणि ते कारण म्हणजे तिचं वैयक्तिक आयुष्य. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला तिचा जीवनसाथी सापडला आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोण आहे? नोरा लवकरच विवाहबंधनात अडकणार का? तिला आपला जीवनसाथी सापडला आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे? दरम्यान, नोराचा 'सपनों का राजकुमार' नक्की कोण? असा प्रश्न चाहतेवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.
नोरा फतेही तिच्या वैयक्तिक आयुष्याबरोबच तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. नोरा आता तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. 2022 या काळात नोराने फिफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म केला होता. 'लाइट द स्काय' हे गाणं तिनं गायलं होतं. त्यामुळे, फुटबॉलशी तिचे जुने नाते असले तरी, आता तिचे ह्रदय एका फुटबॉलपटूसाठी धडधडत आहे. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, नोरा एका करोडपती फुटबॉलपटूला डेट करत आहे. ती खास 2025 च्या आफ्रिकन कप ऑफ नेशन्स फुटबॉस सामने पाहण्यासाठी मोरक्कोला गेली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबई आणि मोरोक्कोमध्ये दोघांना बऱ्याचदा स्पॉट करण्यात आले आहे. पण दोघांनी सध्या ही बाब प्रायव्हेट ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. कारण नोरा सध्या कामावर लक्ष केंद्रीत आहे. याच कारणामुळे तिने वैयक्तिक आयुष्य गुपित ठेवणे आहे.
Nora fatehi Bpyfriend: नोराची पोस्ट व्हायरल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोरा सध्या एका प्रसिद्ध फुटबॉसपटूला डेट करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु, त्या व्यक्तीची ओळख अद्याप पूर्णपणे अस्पष्ट आहे. नोराचे कोणाशीही नाव जोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तिचे नाव प्रिन्स नरूला, अंगद बेदी आणि टेरेन्स लुईस यांच्याशी जोडले गेले होते. तसेच अमेरिकन गीतकार बेन्सन बूनसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. दरम्यान, तिचे सध्या नाव करोडपती फुटबॉलपटूसोबत जोडले जात आहे. नोराचे रिलेशनशिप सुरू आहे का? ती लवकरच लग्नबंधनात अडकणार का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
