Lyricist reaction on Nora Fatehi Song: बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रीत केलेल्या 'सरके चुनर तेरी सरके' या नव्या गाण्याची. गाणं प्रदर्शित होतात दुसऱ्याच दिवशी हे गाणं बंद करावं अशी मागणी होऊ लागली. या गाण्यानं अश्लील त्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्याचे आरोप सोशल मीडियावर केले जात आहेत. हे गाणं आगामी 'केडी द डेव्हिल'या चित्रपटातील असून त्यातील बोल, नृत्य आणि सादरीकरणावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. या गाण्याच्या सुरुवातीचे बोल सामान्य वाटत असले तरी पुढे येणाऱ्या काही ओळींमध्ये शब्दांची मर्यादा ओलांडल्याचा आरोप अनेक जण करत आहेत. वाद आणि टीका झाल्यानंतर निर्मात्यांनी youtube वरून हे गाणं हटवलं आहे. दरम्यान, या गाण्याचे गीतकार रकीब आलम यांनी या गाण्यावरून होत असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. आपण या गाण्याचे बोल लिहिलेच नाहीत असे स्पष्ट सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्याची एकच चर्चा आहे. 

काय म्हणाले रकिब आलम? 

एचटी सिटीशी बोलताना रकीब म्हणाले, " हे गीत मी लिहिलेलं नाही. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांनी हे मूळ गाणं कन्नड भाषेत लिहिलेलं होतं. मला हे गाणं लिहायला सांगितलेलं तेव्हा मी नकार दिला. इतके अश्लील शब्द गाण्यात चालणार नाहीत. सेन्सर बोर्डाचा त्यावर आक्षेप येईल असं मी त्यांना बजावलेलं ' असं रकीब म्हणाले. नकार दिल्यानंतर त्यांनी मला भाषांतर करायला सांगितलं. " त्यांनी मला फक्त कन्नड शब्दांचे शब्दशः हिंदीत भाषांतर करून मागितले होते. जेणेकरून ते चालीत बसवता येतील. 'चुसेगा ' 'चाटेगा ' यासारखे आक्षेपार हा शब्द मूळ कन्नड गाण्यातले आहेत. " असं रकीब आलम म्हणाले.

गाणं लिहिण्यास दिला नकार

रकिब आलम म्हणाले, 'गाण्याच्या शेवटी समजतं की हे गाणं दारूच्या बाटली बद्दल आहे. कोणत्या आधीचे सर्व शब्द हे गलिच्छच आहेत. हे गाणं लिहिण्यास मी नकार दिला होता. मी का असं गाणं लिहीन ? मी जेव्हा चांगली गाणी लिहितो तेव्हा त्याची कोणीही दखल घेत नाही. मी पुष्पा चित्रपटातील सर्व हिंदी गाणी लिहिली आहेत. आगामी पेड्डे चित्रपटासाठी चिखली चिखली गाणं लिहिला आहे. चुनरिया गाण्यामुळे मलाच लाज वाटतेय '

ते पुढे म्हणाले" सोमवारी रात्री निर्मात्यांनी मला फोन केला आणि हे गाणं सबवे शब्दात पुन्हा लिहून देण्याची विनंती केली आहे. मंगळवार सकाळपर्यंत मी ते लिहून दिलं आणि आता त्याचा रेकॉर्डिंगही झालंय. लवकरच हे नवीन गाणं माफीनाम्यासह रिलीज केलं जाईल . " असेही ते म्हणाले.