Nora Fatehi Linked With Football Star Achraf Hakimi: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) मोहक अदा आणि नृत्यासाठी प्रसिद्ध आहे.  तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात.  ती अलिकडेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.  नोरा आपलं पर्सनल आयुष्य कायम खासगी ठेवते. परंतु, काही महिन्यांपासून तिचं नाव एका लोकप्रिय फुटबॉलरसोबत जोडलं जात आहे. दोघांच्या रिलेशनशिपची प्रचंड चर्चा होत आहे.  अलिकडेच अभिनेत्री  मोरक्कोला गेली होती.  ती  अफ्रिकी कप ऑफ नेशन्सचा सामना पाहण्यासाठी गेली होती.  तिथे नोरा नॅशनल फुटबॉल टीमला चिअर करत होती.  तेव्हापासून फुटबॉलर अशरफ हकीमी नेमका आहे तरी कोण? अशी चर्चा रंगली होती.  दरम्यान,  फुटबॉलरचं खासगी आयुष्य अत्यंत वादग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. 

अशरफ हकीमी (वय वर्ष 27) हा एक लोकप्रिय फुटबॉल प्लेअर आहे.  त्याचे आई - वडील हे मोरोक्कन अरब वंशाचे आहेत.  2020 साली त्यानं एका स्पॅनिश अभिनेत्रीसोबत विवाह केला होता. हिबा अबूक आणि अशरफ हकीमी या दोघांना  2  मुले आहेत.  परंतु, दोघांमध्ये प्रचंड मतभेद होते. दोघांमध्ये कायम भांडणं होत. याच कारणास्तव दोघांचे नाते काही वर्षातच तुटले.  2023 साली दोघांनी एकमेकांशी काडीमोड घेतला.  त्याचं वैवाहिक जीवन फार चांगले नव्हते. नंतर तो सिंगल आयुष्य जगत होता.  

 

2023 साली  अशरफ हकीमीवर गंभीर आरोप करण्यात आले होते. पॅरीस येथील एका प्रकरणात त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.  त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.    हे आरोप ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या उद्देशाने त्याच्याविरुद्ध करण्यात आल्याचा दावा अशरफ हकीमीने केला. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.  या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती. 

गेल्या काही महिन्यांपासून नोरा फतेहीचं नाव अशरफ हकीमीसोबत जोडले जात आहे.   दोघांमध्ये रिलेशनशिप सुरु आहे का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही. नोरानं कधीही या नात्यावर भाष्य केलं नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

करीना अन् शाहिद कपूरचा Kiss व्हिडिओ, पूनम पांडेचा Oops मोमेंट, 'या' कलाकारांचे MMS झाले होते व्हायरल