Nikki Tamboli Gets Emotional As Arbaaz Patel Proposed: टेलिव्हिजनवरची स्टार अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) नेहमीच चर्चेत असते. तिच्या रिअॅलिटी शोमधल्या (Reality Show) अपिरियन्समुळे तिचे अनेक चाहते आहेत. सध्या निक्की तांबोळी 'द 50' शोमध्ये दिसतेय. शोमध्ये ती तिच्या स्ट्रॅटर्जीसोबतच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. अशातच तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेलही (Arbaz Patel) शोमध्ये आलाय. सध्या शोमधले दोघांचे रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

'द 50' मध्ये अरबाज पटेलनं निक्की तांबोळीला एका गुडघ्यावर प्रपोज केलं. अरबाज पटेलनं प्रपोज केल्यानंतर निक्की तांबोळी केवळ इमोशनल झाली नाही तर, तिनं शोमध्ये आपलं मनही मोकळं केलं. निक्कीनं सांगितलं की, तिने तिच्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन अरबाज पटेलला साथ दिली आहे. 'द 50' मध्ये असताना, अभिनेत्रीनं सांगितलं की, ती या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होती, पण, ती घाबरली देखील आहे, कारण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. 

अरबाजनं गुडघ्यावर बसून केलं निक्कीला प्रपोज

'द 50' शोमध्ये अरबाज पटेलनं गुडघ्यावर बसून निक्कीला प्रपोज केलं. त्यावेळी अरबाज म्हणाला की, "माझ्यात बरंच टॅलेंट आहे. मी अनेकांना इम्प्रेस केलं आहे. पण कलर्सवरच कोणीतरी मला इम्प्रेस केलं होतं. निक्की मला बऱ्याचदा बोलायची की आपण एकमेकांना अजूनपर्यंत ऑफिशियली प्रपोज केलेलं नाही. कलर्सनेच आमची जोडी बनवली होती त्यामुळे मी विचार केलेला की परत संधी मिळाली तर कलर्सवरच निक्कीला प्रपोज करेन..."

अरबाज निक्कीला स्टेजवर घेऊन येतो आणि गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करतो. "माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी रागात असेन तर निक्कीला पाहून माझा रागही शांत होतो. मला निक्कीशिवाय इतर कोणीच शांत करु शकत नाही... अगदी घरातलेही नाही.", असं अरबाज म्हणतो. 

अरबाजनं प्रपोज केल्यानंतर निक्कीच्या अश्रुंचा बांध फुटला

अरबाज पटेलच्या प्रपोजलनंतर 'द 50' मध्ये निक्की तांबोळी ढसाढसा रडली. निक्की म्हणाली की, "हा क्षण माझ्या आयुष्यात यावा असं मला कायम वाटायचं. पण मला भीतीही वाटतीये कारण माझे वडील या नात्याच्या विरोधात आहेत. आमचा धर्म वेगळा आहे. गेल्या दीड वर्षापासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. पण माझे वडील या नात्याचा स्वीकार करत नाहीयेत. मी माझ्या वडिलांच्या इच्छेविरोधात हे करत आहे कारण माझ्या आईने मला कायम हेच शिकवलं की, कोणासाठी आपल्या प्रेमाचा त्याग कधीही करायचा नाही. वडिलांचं प्रेम वेगळं आणि एका पार्टनरचं प्रेम वेगळं... माझे वडील आमच्या प्रेमाला समजून घेतील अशी मला आशा आहे... कारण माझं अरबाजवर खूप प्रेम आहे..."

'बिग बॉस मराठी'वर सुरू झालेली अरबाज, निक्कीची प्रेमकहाणी 

अरबाज पटेल (Arbaz Patel) आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) यांची प्रेमकहाणी 'बिग बॉस मराठी'वर सुरू झालेली. लोकांना दोघांची केमिस्ट्री खूप आवडलेली. सध्या दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. लग्नाबद्दल बोलताना निक्की तांबोळी म्हणाली की, जोपर्यंत मी किंवा अरबाज रिअॅलिटी शो जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करण्याचा चान्सच नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde 'मी जुन्नरची, आमच्याकडे हातात बांगड्यांऐवजी तलवार दिली जाते...'; बिग बॉसवर आरोप करताना दिव्या शिंदेचं मोठं वक्तव्य