Nikki Tamboli Arbaz Patel Breakup: 'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi 5) या रिअॅलिटी शोमुळे (Reality Show) चर्चेत आलेले कपल निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांची केमिस्ट्री प्रचंड चर्चेत आली होती. हे दोघेही सोशल मीडियात प्रचंड चर्चेत असतात. दोघांचे फोटो तुफान व्हायरल होतात.  आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील हे कपल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट (Relationship) केल्यानंतर आता त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे, अशा बातम्या सोशल मीडियात व्हायरल (Social Media) होत आहे. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो (Instagram) केल्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी अधिकच जोर आला आहे.  निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल दोघांनीही  गुढ पोस्ट आपआपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्या आहेत.   सध्या दोघांचीही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांनी नुकतंच एकमेकांना अनफॉलो केलं आहे.  अरबाज पटेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे.  त्याने चिटिंग संबंधित एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.  त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'आपल्या पार्टनरला धोका देणं आणि घरी परतल्यानंतर पार्टनरच्या डोळ्यात डोळे घालून 'मी तुझ्यावर प्रेम करतो/ करते', असं म्हणणे.. हा एक डिसरिस्पेक्टचा वेगळाच स्तर आहे. जे काही मला म्हणायचे होते, ते मी म्हटलं आहे', असं अरबाजने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अरबाज पटेलच्या पोस्टनंतर निक्की तांबोळचीही  क्रिप्टिक पोस्ट समोर आली आहे (Nikki Tamboli And Arbaz Patel Unfollow Each Other Breakup Rumours)

अरबाज पटेलची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होताच, निक्की तांबोळीचीही क्रिप्टिक पोस्ट समोर आली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'सत्य ते नाही, जे ते सांगतात.  कोणीतरी आकर्षक व्यक्ती दिसली म्हणून अफेअर होत नाही.  तर, कुणीतरी जुनी व्यक्ती आपली वचनं पाळणं सोडून देतात, या कारणामुळे होतात' , असं निक्की  तांबोळीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. यानंतर दोघांच्याही ब्रेकअपच्या बातम्यांना उधाण आलं आहे. 

Continues below advertisement

दरम्यान, अद्याप निक्की आणि अरबाज या दोघांनीही आपल्या ब्रेकअपबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ब्रेकअपच्या बातम्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, दोघांच्या नात्यात नेमकं काय बिनसलं आहे? दोघांनी एकमेकांना अनफॉलो  का केलं? हे अद्याप समोर आलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, निक्की आणि अरबाज यांची भेट रिअॅलिटी शो 'बिग बॉस 5'  मध्ये झाली.  या रिअॅलिटी शोमध्ये असताना दोघांमधील जवळीक वाढली असल्याचं बोललं जात आहे.   दोघांमधील प्रेम वाढत गेलं.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Great Khalis Car Accident: WWE स्टार द ग्रेट खलीच्या कारचा भीषण अपघात, दुसऱ्या चारचाकीला धडक, VIDEO व्हायरल