Pushpa 2 Actor Allu Arjun: मागील अनेक दिवसांपासून अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा 2 (Pusha 2) सिनेमा बराच चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 5 डिसेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित झालाच. पण पहिल्याच दिवशी सिनेमाला गालबोट लागलं. कारण हैदराबादमधील एका थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला. गुदमरल्यामुळे त्याच महिलेच्या दोन लहान मुलांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.


या संपर्ण घटनेनंतर अल्लू अर्जुनने एक व्हिडीओ शेअर करत लोकांची माफी देखील मागितली. त्याने त्या व्हिडीओमध्ये म्हटलं की, एवढी गर्दी होईल याची खरंच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला या मृत्यूची बातमी मिळाली. मी त्या मुलांसोबत आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना 25 लाख रुपये  देऊ इच्छितो. पण अल्लू  अर्जुनच्या या व्हिडीओनंतर त्याला सोशल मीडियावर बरंच ट्रोल करण्यात आलं आहे. 


अल्लू अर्जुनवर नेटकऱ्यांचा संताप


अल्लू अर्जुनच्या एका व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं की, आम्हाला त्याच क्षणी कळालं, पण दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं, असं तुम्ही म्हणताय, केवळ उपकार म्हणून तुम्ही हे पाऊल उचलत आहात, हे स्पष्ट होतंय. तू तुझा आदर गमावला आहेस आणि मला तुझी लाज वाटत आहे. हे अगदी साधेपणाने सांगितलं असतं तरीही चाललं असतं, त्यासाठी हुडी वैगरे घालण्याची गरज नव्हती. जे नुकसान झाले ते कोणीही भरून काढू शकत नाही. तो सर्वस्वी तुमचा दोष होता. पोलीस किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला न कळवता असेच चित्रपटगृहात गेल्यास काय होईल?  25 लाख रुपये देखील त्यांचे नुकसान भरून काढू शकणार नाहीत 


अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल


या प्रकरणी मृताच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटरविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 105 आणि 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुष्पा 2 सिनेमा 00 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाने भारतात जवळपास 350 कोटींची कमाई केली आहे. दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहाज फासिल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 






ही बातमी वाचा : 


Shashank Ketkar : 'माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल'; शशांक केतकरच्या पोस्टने वेधलं लक्ष