एक्स्प्लोर

Netflix Movie Trending: नेटफ्लिक्सवर 2 तास 18 मिनिटांच्या या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा; माधुरीच्या 'माँ बहन'लाही देतेय टक्कर

या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही पसंती मिळत आहे. IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 7.6 इतकं दमदार रेटिंग मिळालं आहे.

OTT Movie: OTT वर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट, सिरिज प्रदर्शित होत असतात. गेल्या काही दिवसांपासून माधूरी दीक्षितची माँ बेहेन चित्रपटाची नेटफ्लिक्सवर एकच चर्चा होती. पण नेटफ्लिक्सवर सध्या एका लव्ह स्टोरी ड्रामाने एकच धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट लोकप्रियतेच्या बाबतीत माधुरी दीक्षितच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'माँ बहन' या चित्रपटालाही कडवी टक्कर देताना दिसत आहे.

नेटफ्लिक्सवर दर आठवड्याला काही ना काही नवीन येत असतं. अलीकडेच नेटफ्लिक्सवर अनेक नवीन चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यात दक्षिण चित्रपटसृष्टीतील '29' या लव्ह स्टोरी ड्रामा चित्रपटाचाही समावेश आहे.

नेटफ्लिक्सवर '29'ची क्रेझ

माधुरी दीक्षित अभिनित डार्क कॉमेडी थ्रिलर 'माँ बहन' सध्या नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत टॉपवर आहे. मात्र, तिच्या पाठोपाठ '29' हा तमिळ चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत असून प्रेक्षकांकडून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

2 तास 18 मिनिटांच्या या चित्रपटाची कथा 29 वर्षांच्या एका तरुणाभोवती फिरते. वाढत्या वयासोबत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा आणि करिअरमध्ये स्थिर होण्यासाठी त्याच्यावर दबाव असतो. अशातच त्याच्या आयुष्यात एका तरुणीची एंट्री होते. ती आपल्या करिअरमध्ये आधीच स्थिर असते. स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून असते.

दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलते आणि त्यांच्यात खास नातं निर्माण होतं. मात्र, कथेत अचानक एक मोठं वळण येतं आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. त्यानंतर कथा भावनिक वळण घेते. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना '29' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहावा लागेल.

IMDb वरही दमदार रेटिंग

'29' या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचीही पसंती मिळत आहे. IMDb वर या चित्रपटाला 10 पैकी 7.6 इतकं दमदार रेटिंग मिळालं आहे. त्यामुळे लोकप्रियता आणि रेटिंग या दोन्ही बाबतीत हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता विधू आणि अभिनेत्री प्रीती असरानी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर माधुरी दीक्षित अभिनित 'माँ बहन'शी त्याची तुलना होत असल्याने या चित्रपटाची अधिक चर्चा रंगली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
The Odyssey Movie Review: ख्रिस्तोफर नोलनचा मास्टरपीस, अंगावर शहारे आणणारे 'द ओडिसी'चे सीन्स; अद्भूत सीनेमॅटिक सफर
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
धक्कादायक घटना, वरिष्ठांचा जाचाला कंटाळून ZP शिक्षकाची दोन मुलं अन् गाडीसह नदीपात्रात उडी; व्हॉट्सअपला स्टेटस
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Embed widget