OTT Trending Comedy Movie: दर आठवड्याला OTT वर काही ना काही नवीन पाहायला मिळतं, पण यावेळी आलेली ही फिल्म खास आहे. कुटुंबासोबत बसून एन्जॉय करता येईल असा हा चित्रपट आहे. यात कॉमेडी आणि सस्पेन्सचा फुल डोस पाहायला मिळतो. OTT प्लॅटफॉर्मवर नुकतीच एक नवी डार्क कॉमेडी फिल्म रिलीज झाली आहे आणि ती सध्या नंबर-1 वर ट्रेंड करत आहे. (Netflix Trending Movie)
या चित्रपटाची कथा आणि सीन इतके मजेदार आहेत की तुम्ही हसून-हसून लोटपोट व्हाल. ही फिल्म थेट OTT वर रिलीज होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच करण्यात आली होती आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. आता चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला असून, तो OTT वर नंबर-1 ठरला आहे.
मोठ्या चित्रपटांना मागे टाकत नंबर-1
या चित्रपटाचे नाव आहे 'टोस्टर'. या चित्रपटाने रिलीज होताच ‘धुरंधर’, ‘मर्दानी 3’, ‘वध 2’ आणि ‘तू या मैं’ यांसारख्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. कथा एका अशा पतीभोवती फिरते, त्याच्या विचित्र वागण्यामुळे त्याची पत्नी आणि आसपासचे लोक त्रस्त असतात. पण तो एका गिफ्टसाठी काहीही करायला तयार होतो, तेव्हा खरी गंमत सुरू होते.
रामाकांत हा अतिशय कंजूस माणूस असतो, जो प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवतो. त्याची पत्नी शिल्पा त्याच्यापेक्षा स्वभावाने वेगळी असते. एका लग्नसमारंभात रामाकांतला मजबुरीने महागडा टोस्टर गिफ्ट द्यावा लागतो, आणि हा खर्च त्याच्या मनाला सतत खटकत राहतो. पण लग्न दुसऱ्याच दिवशी मोडतं, तेव्हा रामाकांत त्या टोस्टरला परत मिळवण्याचा निर्धार करतो. त्याच्या या हट्टातून त्याची एक विचित्र आणि गुंतागुंतीची सफर सुरू होते.
काय आहे कथा आणि स्टारकास्ट?
टोस्टर चित्रपटात राजकुमार राव, सान्या मल्होत्रा आणि अभिषेक बॅनर्जी मुख्य भूमिकेत आहेत. 15 एप्रिल रोजी OTT वर रिलीज झालेली ही डार्क कॉमेडी एका अतिशय कंजूस व्यक्तीभोवती फिरते. तो आपल्या पत्नीच्या गुरूजींच्या मुलीच्या लग्नात टोस्टर गिफ्ट देतो. मात्र, नंतर त्यांना घटस्फोट झाल्याचं समजताच तो आपला दिलेला टोस्टर परत मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो आणि इथूनच सुरू होतो भन्नाट गोंधळ.
रामाकांतच्या भूमिकेत त्यांनी कंजूषपणा, भीती, चलाखी आणि असहायता अतिशय अचूकपणे साकारली आहे. त्यांचा अभिनय कुठेही बनावट वाटत नाही. चेहऱ्यावरील भाव, शरीरभाषा आणि वेगवान संवाद यामुळे कॉमेडी अधिक मजा येते.
24 तासांत नेटफ्लिक्सवर कब्जा
हा चित्रपट सध्या Netflix वर स्ट्रीम होत आहे. गेल्या आठवड्यात ‘तू या मैं’ हा चित्रपट नंबर-1 वर ट्रेंड करत होता, पण ‘टोस्टर’ने रिलीज होताच त्याला मागे टाकलं. 2 तास 2 मिनिटांचा हा चित्रपट सध्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे.
