Netflix Top Trending Movie: OTT वर दररोज म्हटलं तरी, काहीना काहीतरी नवीन येत असतं. अनेक सिनेमे सर्वात आधी थिएटरमध्ये रिलीज केले जातात, अन् नंतर ओटीटीवर येतात. बॉक्स ऑफिस (Box Office Hit) गाजवलेले सिनेमे डिजिटल स्वरूपात प्रदर्शित झाल्यावर स्ट्रीमिंग विश्वातही आपला दबदबा निर्माण करतात. या आठवड्यात, असाच एक रोमँटिक सिनेमा थिएटर्समध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी केल्यानंतर, आता OTT वर अव्वल स्थानी आला आहे.
नेटफ्लिक्सच्या 'ट्रेंडिंग' (Netflix Trending) यादीत सध्या पहिल्या क्रमांकावर असलेला सिनेमा एक रोमँटिक ड्रामा (Romantic Drama) आहे, जो 12 जून 2026 मध्ये थिएटर्समध्ये रिलीज झाला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात OTT वर प्रदर्शित (OTT Released) झाल्यानंतर, या सिनेमानं तिथेही अव्वल स्थान मिळवण्यात यश मिळवलंय. या सिनेमाचं नाव 'मैं वापस आऊंगा' (Main Wapas Aaunga). कोणताही गाजावाजा न करता, हा सिनेमा थिएटरमध्ये गपचूप आला आणि काही दिवसांतच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
'मैं वापस आऊंगा'चं क्लोजिंग बॉक्स ऑफिस कलेक्शन (Main Wapas Aaunga Box Office Collection)
'मैं वापस आऊंगा' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केलीय, लोकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाचा याला मोठा फायदा झालाय. या सिनेमात दिलजीत दोसांझ, शर्वरी वाघ, नसीरुद्दीन शाह आणि वेदांग रैना यांसारखी दमदार स्टार कास्ट या सिनेमात आहे. जरी सिनेमाची सुरुवात संथ झाली आणि कमाईचा वेगही सुरुवातीला खूपच मंद होता, तरीही या सिनेमानं बक्कळ कमाई केलीय. 'सॅकनिल्क' (Sacnilk) च्या माहितीनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमानं 1.15 कोटी रुपयांची कमाई केलेली.
एकूणच, या सिनेमानं जगभरात 99.35 कोटी रुपयांची कमाई केली. यात भारतातील नेट कलेक्शन 65.12 कोटी रुपये आणि परदेशातील कलेक्शन 21.98 कोटी रुपये होते, ज्यामुळे सिनेमा यशस्वी ठरलाय.
'मैं वापस आऊंगा'नं किती प्रॉफिट कमावला? (Main Wapas Aaunga Profit)
'मैं वापस आऊंगा' (Main Wapas Aaunga) सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबद्दल सांगायचं तर, सिनेमानं जगभरात 99.34 कोटींची कमाई केलीय, 'कोइमोई'च्या (Koimoi) माहितीनुसार सिनेमाचं बजेट 70 कोटी होतं, याचाच अर्थ बॉक्स ऑफिसवर सिनेमानं 41 टक्के नफा कमावला. हा सिनेमा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक होता.
'मेन वापस आऊंगा' 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा नवव्या क्रमांकाचा सिनेमा (Top Highest Grossing Movies)
'मेन वापस आऊंगा' हा सिनेमा 2026 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत नवव्या स्थानावर आलाय. प्रेक्षकांनी सिनेमाला भरभरून प्रेम दिलं.
- धुरंधर 2 : 1850.85 कोटी
- बॉर्डर 2 : 485.3 कोटी
- भूत बंगला : 292.64 कोटी
- धमाल 4 : 231.12 कोटी
- वेलकम टू द जंगल : 196.11 कोटी
- कॉकटेल 2 : 166.19 कोटी
- ओ रोमियो : 123.1 कोटी
- अल्फा : 99.07 कोटी
- मेन वापस आऊंगा : 98.85 कोटी
- है जवानी तो इश्क होना है : 87.78 कोटी
महत्त्वाच्या इतर बातम्या :
