Eko suspense thriller Netflix: सध्या चित्रपट पाहण्याची सवयच बदलून गेली आहे. थिएटरपेक्षा थेट ओटीटीवर रिलीज होणाऱ्या कंटेंटला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळताना दिसतेय. विशेषतः मिस्ट्री, सस्पेन्स आणि थ्रिलर प्रकारातील चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतात. त्यामुळेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे दमदार प्रयोग सातत्याने पाहायला मिळत आहेत.

Continues below advertisement

अशातच नेटफ्लिक्सवर एक असा चित्रपट रिलीज झाला आहे, ज्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. रिलीज होताच हा सिनेमा ट्रेंडिंगमध्ये पोहोचला असून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटाचे कथानक पाहताना स्क्रीन वरून शेवटपर्यंत नजर हटणार नाही . हा चित्रपट पाहताना प्रत्येक सीनमध्ये नवं रहस्य उलगडत जातं आणि कथा एका वेगळ्याच वळणावर पोहोचते.

अनपेक्षित ट्विस्ट्स प्रेक्षकांचा थरकाप उडवणार 

या मल्याळम मिस्ट्री-थ्रिलर चित्रपटाचं नाव आहे ‘एको’ (Eko). या सिनेमाची कथा एका अचानक गायब झालेल्या व्यावसायिकाभोवती फिरते. त्याचा शोध घेताना समोर येणारे धक्कादायक सत्य, गुंतागुंतीचे धागेदोरे आणि अनपेक्षित ट्विस्ट्स प्रेक्षकांचा थरकाप उडवतात. प्रत्येक काही मिनिटांत कथा वेगळंच वळण घेते, त्यामुळे पुढे काय होणार याचा अंदाज बांधणं अशक्य होतं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर ‘एको’ सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक करत केलंय . विशेष म्हणजे IMDb वरही या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली असून, प्रेक्षकांनी याला 8 .2 रेटिंग दिलं आहे.

Continues below advertisement

 

सुमारे दोन तासांचा हा सिनेमा अशी पकड घेतो की मध्ये पॉज घ्यावंसंही वाटत नाही. कथा, पार्श्वसंगीत आणि सस्पेन्सची बांधणी यामुळे हा चित्रपट एक वेगळाच थरारक अनुभव देतो. जर तुम्हाला रहस्य, थ्रिल आणि ट्विस्ट्स असलेले सिनेमे आवडत असतील, तर ‘एको’ तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायलाच हवा. वीकेंडला “काय पाहावं?” असा प्रश्न पडत असेल, तर हा सिनेमा तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. एकदा पाहायला सुरुवात केली, की शेवटपर्यंत स्क्रीनकडे पाहत राहाल, इतका हा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे.