Netflix : नेटफ्लिक्स (Netflix)या लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक  नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात.  नेटफ्लिक्स कंपनीनं सात वर्षानंतर पहिल्यांदाच त्यांच्या कल्चर गाईडलाईन्स  अपडेट केल्या आहेत. नव्या गाईडलाईननुसार नेटफ्लिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जो कंटेंट आवडणार नाही त्या कंटेंटवर देखील काम करावं लागेल. कंपनीनं या  गाईडलाईन्समध्ये सांगितलं आहे की, जे कर्मचारी या प्लॅटफॉर्मवरील कंटेंटला समर्थन करणार नाहीत किंवा ज्यांना  कंटेंट आवडला नाही ते नोकरी सोडू शकतात.'  


नेटफ्लिक्सनं दिलेल्या गाईडलाईनमध्ये 'आर्टिस्टिक एक्सप्रेशन'  नावाच्या नव्या सेक्शनचा समावेश झाला आहे. या सेक्शनमधून प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रोग्रॅम्सच्या ऑफर्स देण्यात येणार आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कलाकार किंवा कंटेंट हा सेन्सॉर करण्याऐवजी आम्ही प्रेक्षकांना त्यांच्यासाठी काय योग्य आहे हे ठरवून देऊ शकतो. नेटफ्लिक्स कंपनीला त्यांच्या कंटेंटमध्ये कथांमध्ये विविधता आणू इच्छिते.


नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने सांगितले,  कर्मचाऱ्यांसोबत सांस्कृतिक विषयांवर अंतर्गत चर्चा करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागला. नव्या गाईडलाईनचा उद्देश हा कर्मचाऱ्यांना सूचना देणे हा आहे. ज्यामुळे हे कर्मचारी ठरवू शकतील की नेटफ्लिक्स ही कंपनी त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही. कर्मचाऱ्यांना नव्या संस्कृती मार्गदर्शक तत्त्वांवर  प्रतिक्रिया देण्याची संधी देण्यात आली होती. नेटफ्लिक्सला 1,000 हून अधिक टिप्पण्या मिळाल्या. त्यानंतर नव्या गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या. टेस्ला कंपनीचे संस्थापक एलन मस्क नेटफ्लिक्स कंपनीच्या या नव्या गाईडलाईन्सचं कौतुक केलं आहेत.


नेटफ्लिक्सचा मोठा निर्यण; अकाऊंट शेअर करणाऱ्यांना भरावे लागणार जास्त पैसे, लागू करणार


नवा नियमरिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स कंपनी आता लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. फॅमिलीमधील लोक सोडून इतर व्यक्तींसोबत नेटफ्लिक्स अकाऊंट शेअर करणाऱ्या युझर्सला आता जास्त पैसे भरावे लागणार आहेत.  मार्च महिन्यामध्ये कंपनीनं नव्या नियमाचे परीक्षण चिली, कोस्टारिका आणि पेरु येथे सुरू केले पण आता पुढच्या वर्षापासून हा नियम जागतिक स्तरावार लागु करण्याचा विचार नेटफ्लिक्स ही कंपनी करत आहे. 


हेही वाचा :