National Film Awards News : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (National Film Awards) 72 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत नेहमी देशाची राजधानी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित केला जाणारा हा भव्य सोहळा यंदा दिल्लीबाहेर आयोजित केला जाणार आहे. गुजरातमधील केवडिया (सध्याचे नाव एकता नगर) येथील जगातील सर्वात उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (Statue of Unity) समोर हा 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते विजेत्यांना हे मानाचे पुरस्कार प्रदान केले जातील.

Continues below advertisement

Ek Bharat Shreshtha Bharat : 'एक भारत, श्रेष्ठ भारत' संकल्पना

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीच्या बाहेर देशाच्या विविध भागांत आयोजित करण्याचा मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे आणि प्रादेशिक विविधतेला सन्मान देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

1954 मध्ये स्थापन झालेले हे राष्ट्रीय पुरस्कार भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित सन्मान मानले जातात. 7 दशकांपासून दिल्लीत होणाऱ्या या सोहळ्याचे ठिकाण बदलून यंदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 597 फूट उंच स्मारकासमोर (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठेवण्यात आले आहे.

Continues below advertisement

Best Actor Actress Awards : मामुटी, कार्तिक आर्यन सर्वोत्कृष्ट अभिनेता; यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

वर्ष 2024 मधील भारतीय सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जाणार असून यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा गौरव केला जाईल:

सर्वोत्कृष्ट चित्रपट (Feature Film): आर्टिकल 370 (Article 370)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: यामी गौतम (आर्टिकल 370)

सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून): मामुटी ('ब्रह्मयुगम') आणि कार्तिक आर्यन ('चंदू चॅम्पियन')

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: रणदीप हुड्डा ('स्वातंत्र्य वीर सावरकर')

सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म: 'भंगार'

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री (ज्युरी): 'राम-नामी'

Regional Cinema Celebrated : मराठी, संथाली, तमिळसह प्रादेशिक चित्रपटांचा डंका

यंदाच्या 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचा मोठा दबदबा पाहायला मिळणार आहे. यामध्ये मराठी, संथाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, तुळू आणि गढवाली भाषांमधील उत्कृष्ट चित्रपटांचा गौरव केला जाईल.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या नॉन-फीचर फिल्म श्रेणीमध्ये पहिल्यांदाच एका 'संथाली' भाषेतील चित्रपटाला सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय 'कल्कि 2898 एडी', 'अमरन', 'पुष्पा 2: द रुल', 'भूल भुलैया 3' आणि 'स्त्री 2' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.

Best Writing On Cinema : संजीव श्रीवास्तव सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक

सिनेमावरील उत्कृष्ट लेखनासाठी,

सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: संजीव श्रीवास्तव

ही बातमी वाचा: