एक्स्प्लोर

NCP Leader on Tukaram Mundhe: हिंदी, मराठी मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे जेवण मिळते, राष्ट्रवादीच्या नेत्याची तुकाराम मुंढेंकडे पत्राद्वारे तक्रार

Poor Food Served on Film and TV Sets: महाराष्ट्रातील हिंदी आणि मालिकांमध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा आरोप.

NCP on Poor Food Served on Film and TV Sets:  गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन आयु्क्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहिम सुरू केली आहे.  FDAकडून आतापर्यंत अनेक कंपन्यांच्या (Entertainment) भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे.  अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवत, चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत माहिती दिली. तसेच स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने राज्यस्तरीय तपासणी करून आवश्यक ती कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.

मालिका अन् चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा आरोप (Poor Food Served on Film and TV Sets NCP Leader demands action)

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी तसेच हिंदी मालिकांचे, चित्रपटांचे आणि वेब सिरीजचे  शूटिंग सुरू असते. चित्रिकरणादरम्यान कलाकारांना आणि तंत्रज्ञांना  अन्न पुरवण्यात येते. पण ते अन्न निकृष्ट दर्जाचे असून,  अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात येतात.  दरम्यान, हाच प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवत यावर कारवाई करण्याची मागणी केली. 

महाराष्ट्र राज्यात मुंबई, पुणे, नाशिक तसेच इतर अनेक शहरांमध्ये मराठी, हिंदी आणि विविध भाषांतील मालिका, चित्रपट आणि वेब मालिकांचे मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण सुरू असते. या चित्रीकरणामध्ये हजारो कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक कर्मचारी आणि इतर कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र, अनेक चित्रीकरण स्थळांवर कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत आहेत, असं बाबासाहेब पाटील यांनी पत्रात म्हटलं.

तसेच, अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे, अस्वच्छ, आरोग्यास अपायकारक तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे अन्न पुरविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चित्रीकरणाच्या ठिकाणी कलाकार व तंत्रज्ञ सलग 12 ते 16 तास अथवा त्याहून अधिक काळ काम करतात. त्यामुळे त्यांना दर्जेदार, स्वच्छ, पौष्टिक व सुरक्षित अन्न मिळणे ही संबंधित निर्मिती संस्था, केटरिंग सेवा पुरवठादार व संबंधित उत्पादन संस्थांची कायदेशीर तसेच नैतिक जबाबदारी आहे. परंतु अनेक ठिकाणी या जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आपण नुकतीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी जबाबदारी स्वीकारली असून, या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन राज्यातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली. 

बाबासाहेब पाटील यांनी पत्राद्वारे कोणत्या मागण्या केल्या,

1.राज्यभरातील सर्व चित्रपट, मालिका व वेब मालिकांच्या चित्रीकरण स्थळांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत अचानक (Surprise) तपासणी मोहीम राबविण्यात यावी.
2. कलाकार व तंत्रज्ञांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचे नमुने तपासून अन्नसुरक्षा व मानके अधिनियम (FSSAI) अंतर्गत त्यांची गुणवत्ता तपासण्यात यावी.
3. निकृष्ट, अस्वच्छ अथवा आरोग्यास अपायकारक अन्न पुरविणाऱ्या केटरिंग कंत्राटदार, निर्मिती संस्था व संबंधितांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
4. सर्व चित्रीकरण स्थळांसाठी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, साठवण, पिण्याचे पाणी, स्वयंपाकगृहाची स्वच्छता व अन्न वितरणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी करण्यात यावीत.
5. अन्नसुरक्षा नियमांचे नियमित पालन होत आहे की नाही यासाठी वेळोवेळी विशेष तपासणी व निरीक्षण मोहीम राबविण्यात यावी.
कलाकार व तंत्रज्ञांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Salman Khan on Pradeep Rawat: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरमुळे मृत्यू; सलमान खानची पोस्ट चर्चेत, दु:ख व्यक्त करत म्हणाला...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget