Nandita Patkar Talk About Mandar Devsthali: मराठी अभिनेता (Marathi Actress) शशांक केतकरनं (Shashank Ketkar) एक सोशल मीडिया पोस्ट करत सुप्रसिद्ध दिग्दर्शक (Marathi Director) मंदार देवस्थळी (Mandar Devsthali) यांच्यावर पैसे बुडवल्याचे गंभीर आरोप केले. त्यानंतर मराठी मनोरंजन विश्वात मोठी खळबळ माजलेली. शशांकपाठोपाठ इतरही अनेक कलाकारांनी पोस्ट करुन त्यांचेही पैसे बुडवल्याचे आरोप केले. अनेकांनी शशांकला पाठींबा दिला. अशातच आता दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरनं (Marathi Actress Nadita Patkar) तिला आलेला अनुभव सांगितला आहे. कोणाची बाजू चूक किंवा कोणाची बरोबर हे नाही सांगता येणार... पण हे खरंच खूप त्रासदायक आहे, असं नंदितानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
अभिनेत्री नंदिता पाटकर नेमकं काय म्हणाली?
मराठी अभिनेत्री नंदिता पाटकर हिनं 'इट्स मज्जाला' मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना नंदिता म्हणाली की, "सुदैवानं माझ्या वाट्याला अजूनपर्यंत असा अनुभव आलेला नाही. मला माझ्या काही कामाचे पैसे उशीरा मिळाले पण मिळाले. कोणाची बाजू चूक किंवा कोणाची बरोबर हे नाही सांगता येणार... पण हे खरंच खूप त्रासदायक आहे. कारण शेवटी ती प्रत्येकाची रोजी रोटी आहे. मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना आधीच मालिका सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी कामाचे पैसे मिळतात. त्यामुळे काही प्लॅन्स असतात. मी मंदार देवस्थळींकडेही काम केलं आहे. पण माझा अनुभव चांगला होता. तेव्हा असे प्रॉब्लेम्स नव्हते. त्याचं प्रोडक्शन होतं. मी त्याच्या मालिकेत काम केलं होतं".
"ती माझी पहिलीच मालिका होती. तसा मला मालिकेचा काहीच अनुभव नव्हता. जसे परेश मोकाशी माझे पहिले सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तसा मालिकेचा पहिला दिग्दर्शक मंदार देवस्थळी. मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. कारण तो अत्यंत क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे. उठा आणि सीन करा असं तो करत नाही. तो प्रॉपर नाटकाच्या तालमीप्रमाणे रिहर्सल करतो. तसे इमोशन्स काढून घेतो. मला त्याच्याकडून खूप शिकायला मिळालं. तेव्हा त्याची परिस्थितीही चांगली होती. पण मुद्दाम कोणी असं करेल असं मला वाटत नाही. एखाद्याचा डाऊनफॉल असू शकतो. पण मला तरी त्याचा चांगला अनुभव आला", असं नंदिता पाटकर म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
