Political Web Series OTT: ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या एका नव्या वेब सिरीजची जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच 10 भागांची पॉलिटिकल ड्रामा वेब सिरीज ‘संकल्प’ ऑनलाइन प्रदर्शित झाली असून ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्याच्या काळात नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांमुळे ओटीटी प्लॅटफॉर्म नेहमीच चर्चेत असतात. त्यातच ‘संकल्प’ ही सिरीज आपल्या दमदार कथानकामुळे मनोरंजनविश्वात विशेष चर्चेचा विषय ठरलीय. (Web Series)

Continues below advertisement

राजकीय थरार आणि सत्तेच्या खेळाभोवती फिरणारी कथा ही सिरीज प्रेक्षकांसमोर मांडते. 10 भागांमध्ये उलगडणारी ही कथा प्रत्येक एपिसोडमध्ये नवे वळण घेते आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवते. त्यामुळेच सध्या ही वेब सिरीज 2026 मधील सर्वात चर्चेत असलेल्या पॉलिटिकल ड्रामा थ्रिलरपैकी एक मानली जात आहे.

राजकीय डावपेच, नाना पाटेकरांची दमदार भूमिका 

‘संकल्प’ या वेब सिरीजचे दिग्दर्शन हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा यांनी केले आहे. जेंव्हा प्रकाश झा यांसारखा दिग्दर्शक पुन्हा एकदा राजकारणाच्या विश्वावर आधारित कथा घेऊन येतात, तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा आपोआपच वाढतात. राजनीती आणि गंगाजलसारख्या चित्रपटांमधून सत्ताकेंद्र, राजकीय डावपेच आणि व्यवस्थेचे वास्तव उलगडणारी स्वतःची खास ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यांच्या नव्या ‘संकल्प’ या वेब सिरीजमधूनही ते पुन्हा एकदा सत्ता, विचारधारा आणि संस्थात्मक प्रभाव यांच्या गुंतागुंतीच्या जगात प्रेक्षकांना घेऊन जातात. या सिरीजमध्ये नाना पाटेकर यांच्या दमदार उपस्थितीमुळे कथेला अधिक ताकद मिळते.

Continues below advertisement

काय आहे कथनक?

ही 10 भागांची वेब सिरीज लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये राजकारणातील सत्तासंघर्ष, राजकीय डावपेच आणि नेत्यांची कार्यपद्धती प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. अनेकदा राजकारण आणि प्रशासन यांच्यातील गुंतागुंतीचे संबंधही यात उलगडले जातात. प्रशासन कधी राजकारणाच्या प्रभावाखाली काम करते, तर कधी परिस्थिती बदलल्यावर त्याच व्यवस्थेतील त्रुटी उघडकीस येतात, असे वास्तव या सिरीजमधून दाखवले आहे. या सिरीजमध्ये नाना पाटेकर, संजय कपूर आणि मोहम्मद झीशान अयूब यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयामुळे सिरीज अधिक प्रभावी झाली आहे.

प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही ‘संकल्प’ला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की सध्या ही वेब सिरीज एमएक्स प्लेयरवर नंबर-1 स्थानावर ट्रेंड करत आहे. त्यामुळे ओटीटीवरील पॉलिटिकल ड्रामा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘संकल्प’ ही सिरीज खास ठरत आहे.