Nana Patekar On Parinda Movie Shooting: मराठी (Marathi Movie) आणि हिंदी सिनेसृष्टीतला (Hindi Movie) वर्सटाईल अभिनेत्यांच्या यादीत आवर्जुन सामील होणारं नाव म्हणजे, दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar). नानांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सर्वोत्तम सिनेमे केला. त्यापैकी अनेक सिनेमे कल्ट (Cult Movie) ठरले. काही सिनेमांमध्ये नाना पाटेकरांना साकारलेल्या भूमिका अगदी अंगावर काटा आणणाऱ्या होत्या. त्यासाठी खुद्द नानांनी मोठी मेहनतही घेतली होती. अनेक क्लासिक सिनेमांसोबतच नाना पाटेकरांनी अनेग कॉमेडी, हॉरर, थ्रिलर (Thriller Movie) सिनेमेसुद्धा केले. या सिनेमांमधल्या काही सीन्ससाठी मात्र नानांना मोठी कसरत करायला लागायची. परफेक्ट शॉर्ट देण्यासाठी नाना पाटेकरांना अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागायचा. असाच एक किस्सा त्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलेला. 

'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना नाना पाटेकरांनी त्यांनी शूट केलेल्या एका सीनबाबत सांगितलं. सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये क्लायमॅक्स सीनमध्ये नाना पाटेकर जे पात्र साकारत होते, ते आगीत होरपळताना दाखवावं लागणार होतं. पण, त्यावेळी शुटिंग करताना अद्ययावत तंत्रज्ञान तेवढं विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे त्या सीनसाठी डिजिटल आग दाखवू शकत नव्हते. त्यावेळी सेटवर खरीखुरी आग लावण्यात आलेली. पण सीन शूट करताना थोडं इकडे-तिकडे झालं आणि नाना पाटेकर त्या आगीत खरेखुरे होरपळून निघालेले. नानां खूप त्रास झालेला, कित्येक महिने ते अंथरुणाला खिळले होते. 

नाना पाटेकरांनी अपघाताबाबत काय सांगितलं? 

नाना पाटेकर यांनी सांगितलं की, "परिंदामधील ज्या सीनमध्ये मी आगीत होरपळून निघतो.. त्यात माझ्या संपूर्ण शरीराला खरोखरंच आग लागलेली. मला दोन महिने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं... माझी चामडीही जळालेली... सर्व काही जळालं... दाढी, मिशा, पापण्या, सर्व काही जळालं... मी सहा महिने असाच होतो... पहिल्या टेकमध्ये आम्ही तीन बादल्या ओतल्या, दुसऱ्या टेकमध्ये आम्ही 14 बादल्या ओतल्या... आग खूप मोठी होती... तो एक अपघात होता..."

पुढे बोलताना नाना पाटेकरांनी 'सलाम बॉम्बे' सिनेमातील एका दृश्याबाबतही सांगितलं. ज्यामध्ये त्यांना खरोखरंच चाकूनं मारण्यात आलेलं. त्यावेळी सेटवर सर्वांना वाटलेलं की, हा शुटिंग सीन सुरू आहे. पण, त्यावेळी नाना पाटेकरांनावर खरेखुरे वार करण्यात आलेले. 

नाना पाटेकर म्हणाले की, "तुम्हाला तो सीन आठवतो का? जिथे एक मुलगा येतो आणि मला चाकू मारतो? त्या सीनसाठी त्यांनी माझ्या कंबरेला टायर बांधला होता, पण ज्या जोरानं त्या मुलानं माझ्यावर हल्ला केला, त्याच जोरात चाकूनं मला मारलं आणि लगेच रक्त यायला लागलं. त्यांना वाटलं, त्यानं काय अभिनय केलाय, पण तो अपघात होता..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sunny Leone Reaction Donald Trump: '...प्रेम केलं पाहिजे'; डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे सनी लिओनीची मैत्री आलेली धोक्यात, नेमकं काय घडलेलं?