Nana Patekar on India vs Pakistan Cricket Match : आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळावा की नाही? यावरून मोठं वादंग निर्माण झालं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात सर्व पाकिस्तानी कलाकार आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स बॅन करण्यात आले होते. त्यामुळे लोक भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी करत आहेत. बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांनीही याबाबत आपलं मत व्यक्त करत भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

न्यूज एजन्सी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले – “सत्य सांगायचं तर मला वाटतं की मला या विषयावर बोलायलाच नको. तरी देखील माझं वैयक्तिक मत असं आहे की भारताने सामना खेळू नये. जेव्हा आपल्या लोकांचं रक्त सांडलं आहे, तेव्हा आपण त्यांच्यासोबत का खेळावं? माझ्या मते मला फक्त त्या बाबींवर बोलायला हवं ज्या माझ्या हातात आहेत.”

सुनील शेट्टी यांनी दिला होता पाठिंबा

यापूर्वी अभिनेता सुनील शेट्टी यांनी देखील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मत मांडलं होतं. मात्र त्यांनी सामन्याचा विरोध केला नव्हता. ते म्हणाले होते – “हा एक जागतिक क्रीडा संघटनांचा विषय आहे. त्यांचे नियम-कायदे पाळणं आवश्यक असतं कारण इतर अनेक खेळ आहेत आणि त्यात बरेच खेळाडू सहभागी असतात. भारतीय म्हणून मला वाटतं की हे आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे की आपण हा सामना बघायचा की नाही, उपस्थित राहायचं की नाही.”

“तुम्ही क्रिकेटपटूंना दोष देऊ शकत नाही...”

सुनील शेट्टी पुढे म्हणाले – “या सामन्यासाठी कोणत्याही क्रिकेटपटूला जबाबदार धरता येणार नाही. हा निर्णय भारताने घ्यायचा आहे. पण तुम्ही खेळाडूंना दोष देऊ शकत नाही. कारण ते देखील फक्त खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून देशाचं प्रतिनिधित्व करण्याची अपेक्षा असते. हा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागेल. मला जर हा सामना बघायचा नसेल, तर मी पाहणार नाही. काय करायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं आहे. हा निर्णय बीसीसीआयच्या हातात नाही. ही एक जागतिक क्रीडा संघटना आहे आणि कोणालाही दोष देता येणार नाही.”

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Aamir Khan On Bollywood Stars Demands: 'कोट्यवधींचं मानधन घेतात, पण ड्रायव्हरचे पैसेही निर्मात्याकडे मागतात...'; सेलिब्रिटींचे नखरे अन् मागण्यांवर स्पष्टच बोलला आमिर खान