एक्स्प्लोर

Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष

Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: अभिनेते नाना पाटेकर यांचा गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. दिग्गज अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचा गोव्यातील (Goa News) राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं (Nana Patekar Death Due To Cardiac Arrest) निधन झालं. वयाच्या 75व्या वर्षी नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला. गुणी अभिनेत्याच्या अकाली एक्झिटनं सर्वांनाच धक्का बसला आहे. अत्यंत शिस्तप्रिय आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. डॉक्टरांच्या पथकानं तब्बल 45 मिनिटं नानांना सीपीआर दिला, पण त्यांना यश आलं नाही. अखेर नाना पाटकेरांचा मृत्यू (Nana Patekar Death) झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. अशातच आता या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आलीय. नाना पाटेकरांच्या निधनाबाबत गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.  

बीएनएसएस (BNSS) च्या कलम 194 अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर नाना पाटेकरांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नाना पाटेकर यांना रुग्णालयात आणलं, तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. आता पोलिसांकडून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.  

मनिपाल हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी माध्यमांना माहिती दिलेली की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पहाटे 4:20 च्या सुमारास रुग्णालयात आणलx असता ते 'ब्रॉट डेड' (रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत) होते. डॉक्टरांनी सीपीआर (CPR) द्वारे त्यांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यानंतर त्यांना कार्डियाक मसाजही देण्यात आलेला. मग नानांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तोपर्यंत खूप उशीर झालेला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच नानांची प्राणज्योत मालवली होती. 

नियमांनुसार, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला मृत अवस्थेत रुग्णालयात आणलं जातं, त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला पोलिसांना सूचित करणं आवश्यक असतं. त्यानंतर या घटनेची नोंद 'मेडिको-लीगल केस' (MLC) आणि अनैसर्गिक मृत्यू अशी केली जाते. त्यामुळे कायदेशीर तरतुदींनुसार, शवविच्छेदन केलं जातं. 

नाना पाटेकरांच्या पार्थीवाचं शवविच्छेदन...

डॉक्टरांच्या मते, नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) असू शकतं. त्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यावर उपचारही सुरू होते. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. नाना पाटेकरांच्या पार्थीवावर गोवा मेडिकल कॉलेज (GMC) इथे शवविच्छेदन करण्यात आलं.

गोवा पोलिसांकडून तपास सुरू 

नाना पाटेकरांसारख्या शिस्तप्रिय, फिटनेस जपणाऱ्या व्यक्तीचं असं अचानक जाणं, प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेलंय. अशातच, नानांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? हे जाणून घेण्यासाठी कुटुंबीय आणि या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींचे जबाब नोंदवले जातील. पोलीस सध्या नाना पाटेकर यांच्या मृत्यूशी संबंधित परिस्थितीचा तपास करत आहेत. जर तपासात मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचं निष्पन्न झालं, तर हे प्रकरण बंद केलं जाऊ शकतं. पण, काही संशयास्पद आढळलं तर, पोलीस पुढील तपास त्या दिशेनं करतील. 

'नाना' पाटेकर पंचतत्वात विलीन

हृदयविकाराच्या झटक्यामुळे 8 ऑक्टोबर रोजी वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांचं निधन झालं. त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पुणे जिल्ह्यातील डोणेजे गावातील त्यांच्या 'नानाची वाडी' या फार्महाऊसजवळ शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची पत्नी नीलाकांती पाटेकर आणि मुलगा मल्हार पाटेकर यांनी अंत्यविधी पार पाडले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Moushumi Chatterjee Husband Jayant Chatterjee Death : ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीवर दु:खाचा डोंगर; चित्रपट निर्माते पती जयंत मुखर्जी यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Kavya Maran Marriage : ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
ना सप्तपदी, ना पंडित, ना कोणते मंत्रोच्चार; 'या' विवाह पद्धतीत पार पडलं काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदरचं लग्न
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Embed widget