Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज पाठवला, पण...; शेवटच्या काही तासांत काय घडलं? डॉक्टरांनी सर्वच सांगितलं...
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. पण, त्यांच्या अखेरच्या काही तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितलं...

Nana Patekar Death Marathi News: मराठी रंगभूमीपासून (Marathi Theatre) ते अगदी मराठी (Marathi Films), हिंदी सिनेमांपर्यंत (Hindi Movie) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भूमिका फुलवणारा आणि त्या पात्राला योग्य न्याय देणाऱ्या गुणी अभिनेत्यांची जेव्हा चर्चा होते, तेव्हा नाना पाटेकर (Nana Patekar Death) यांच्या नावाचा उल्लेख सर्वात आधी केला जातो. गुणी अभिनेत्याच्या अकाली एक्झिटनं सर्वांनाच धक्का बसला आहे. अत्यंत शिस्तप्रिय आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं (Nana Patekar Passes Away Due To Cardiac Arrest) निधन झालंय. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी गोव्यातील घरात अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांच्या पथकानं तब्बल 45 मिनिटं नानांना सीपीआर दिला, पण त्यांना यश आलं नाही. अखेर नाना पाटकेरांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. पण, नाना पाटेकरांना नेमकं झालं काय? सविस्तर जाणून घेऊयात...
सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव म्हणजे, नाना पाटेकर. गोव्यात त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालंय. पण, मृत्यूपूर्वी नाना पाटेकरांना छातीत तीव्र वेदना होऊ लागलेल्या. तशी तक्रार त्यांनी गोव्यातल्याच एका मित्राला मेसेज पाठवून सांगितलेली. एका डॉक्टरांनी नानांच्या आयुष्यातील शेवटच्या काही तासांचा संपूर्ण वृत्तांत सांगितला आहे.
नानांना सीपीआर देणाऱ्या डॉक्टरांनी काय सांगितलं? (Goa Doctor On Nana Patekar Death)
मनिपाल हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी माध्यमांना माहिती दिली की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पहाटे 4:20 च्या सुमारास रुग्णालयात आणलx असता ते 'ब्रॉट डेड' (रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत) होते. डॉक्टरांनी सीपीआर (CPR) द्वारे त्यांना वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही आणि पहाटे 5:20 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
नाना पाटेकरांनी रात्रीच छातीत तीव्र वेदना, मित्राला मेसेज केला अन्...
डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांनी मध्यरात्री 2:30 च्या सुमारास एका मित्राला मेसेज पाठवून कळवलं होतं की, त्यांची प्रकृती ठीक नाही आणि त्यांना छातीत डाव्या बाजूला वेदना होत आहेत. मध्यरात्री मेसेज केल्यामुळे त्या मित्राला नानांचा मेसेज वेळेवर मिळाला नाही. जेव्हा मित्रानं तो मेसेज पाहिला आणि तो पहाटे 4 च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा नाना पाटेकर यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि ते घामाघूम झाले होते. त्यानंतर, त्यांचा केअरटेकर रुग्णालयातून रुग्णवाहिका घेऊन तिथे पोहोचला. रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत ते पूर्णपणे बेशुद्ध झाले होते, त्यांना घरातच तब्बल 45 मिनिटं सीपीआर देण्यात आला. त्यानंतर कार्डियाक मसाजही देण्यात आला. त्यानंतर नानांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तोपर्यंत खूप उशीर झालेला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच नानांची प्राणज्योत मालवली होती.
नाना पाटेकरांचं पोस्टमार्टम होणार; डॉक्टरांची माहिती
डॉ. शेखर साळकर यांनी स्पष्ट केलं की, रुग्णालयात आणलं असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नव्हते, त्यामुळे नियमांनुसार 'मेडिको-लीगल केस' (MLC) नोंदवण्यात आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवा मेडिकल कॉलेज (GMC) इथे हलवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल.
डॉक्टरांनी हे देखील नमूद केलं की, नाना पाटेकर यांना यापूर्वी कधीही रुग्ण म्हणून या रुग्णालयात दाखल करण्यात आलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्या मेडिकल हिस्ट्रीबाबत रुग्णालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. या घटनेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे.
दरम्यान, विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर. मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव. मराठी रंगभूमीपासून ते मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या नावाची दखल घ्यायला लावणाऱ्या गुणी अभिनेत्यांमध्ये आवर्जुन समाविष्ट होणारं नाव. रंगभूमीपासून आपली कारकिर्द सुरू करणाऱ्या नानांनी नंतर सिनेसृष्टीत पदार्पण केलं आणि एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले. नानांचा जॉनर काय? असा प्रश्न कुणी विचारण्याची हिंमतच करणार नाही. अगदी समांतर सिनेमांपासून, ते कॉमेडी सिनेमांपर्यंत नानांनी आपला ठसा उमटवला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी सिनेमांमध्ये, नाटकांत भूमिका केल्या. नाना पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या. नानांचा मराठीत 'नटसम्राट' हा सिनेमा विशेष गाजला.
पाहा व्हिडीओ : नाना पाटेकर निधन, मणिराल रुग्णालयातील डॉक्टर काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















