Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूचं कारण समोर आलं असून त्यांचा शवविच्छेदन अहवाल जाहीर करण्यात आला आहे.

Nana Patekar Death Cause Revealed: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकाकूल झाला. धडधाकट नानांचं असं जाणं, कुणालाच पटत नव्हतं. अनेकांना तर शिस्तप्रिय आणि फिटनेस फ्रिक नानांचं असं जाणं मोठा धक्का होता. त्यामुळे अनेकांनी नानांच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केलेले. तसेच, गोवा पोलिसांनीही नाना पाटेकरांच्या मृत्यूची अनैसर्गिक नोंद करुन सखोल तपास सुरू केलेला. त्यानंतर नियमांनुसार, नाना पाटेकर (Nana Patekar) यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. ज्याचा अहवाल आता समोर आला आहे. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानंच झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान, गोवा पोलिसांनी नाना पाटेकरांच्या मृत्यूची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केलेली.
केवळ मराठीच नाहीतर, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारं मराठमोळं नाव म्हणजे, दिग्गज अभिनेते नाना पाटेकर. गोव्यात तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर गोव्यातील पणजी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करुन सखोल तपास सुरू केला. नाना पाटेकरांच्या शवविच्छेदन अहवालातून त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं झाल्याचं निष्पन्न झालंय.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथील डॉक्टरांच्या पथकानं हा अहवाल 8 ऑक्टोबर रोजी जारी केला होता. हृदयाच्या मुख्य धमनीत रक्ताची गुठळी निर्माण होणं आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं स्पष्ट केलं आहे. पणजी पोलिसांना 8 ऑक्टोबरला पहाटे सुमारे 5.30 वाजता दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयातून नाना पाटेकर यांना मृतावस्थेत आणण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पणजी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. नाना पाटेकर यांचा मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांबोळी येथील रुग्णालयात नेण्यात आला. तिथे पंचांच्या तसेच त्यांचे पुतणे प्रसाद पाटेकर यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं शवविच्छेदन करून मृत्यूचं कारण स्पष्ट करणारा अहवाल सादर केलाय.
नाना पाटेकरांच्या मृत्यूची अनैसर्गिक मृत्यू म्हणून केलेली नोंद (Nana Patekar Death Cause Revealed)
नियमांनुसार, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला मृत अवस्थेत रुग्णालयात आणलं जातं, त्यावेळी रुग्णालय प्रशासनाला पोलिसांना सूचित करणं आवश्यक असतं. त्यानंतर या घटनेची नोंद 'मेडिको-लीगल केस' (MLC) आणि अनैसर्गिक मृत्यू अशी केली जाते. त्यामुळे कायदेशीर तरतुदींनुसार, शवविच्छेदन केलं जातं. डॉक्टरांच्या मते, नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) असू शकतं, असं सांगितलं होतं. त्यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास होता आणि त्यावर उपचारही सुरू होते. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं होतं. अखेर नाना पाटेकरांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यात त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानंच झाल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















