Nana Patekar Comment On Madhuri Dixit: मराठीतील ज्येष्ठ अभिनेते (Marathi Actor) नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. मराठी, हिंदी सिनेमे (Bollywood News) आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयानं रसिकप्रेक्षकांची मनं जिंकली. अशातच नानांनी आजवर अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली. अनेकींसोबतच्या त्यांच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्रीनं पडद्यावर धम्माल केली. पण, त्यांची आणि माधुरी दीक्षितची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. सध्या सोशल मीडियावर एका पुरस्कार सोहळ्यातला नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षितचा (Madhuri Dixit) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) जेवढे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात, तेवढेच ते त्यांच्या मिश्किल अंदाजासाठीही ओळखले जातात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकरांचा मिश्किल अंदाज व्हायरल होतोय. नानांचं बोलणं ऐकून 'धकधक गर्ल' माधुरीही हसण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातला (Filmfare Awards Ceremony) आहे. खरंतर हा व्हिडीओ जुना आहे, पण, तो पुन्हा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित तब्बल 25 वर्षांनंतर भेटल्याचं सांगतात.
नाना पाटेकर माधुरी दीक्षितला काय म्हणाले?
फिल्मफेयर अवॉर्ड्सच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करत असलेला अभिनेता पुष्कर श्रोत्री नाना पाटेकरांना म्हणाला की, "नाना काका बऱ्याच वर्षांनंतर हा दुर्मिळ क्षण आम्हाला बघायला मिळतोय, काय सांगाल...?"
अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पाटेकर म्हणाले की, "मगाशी मी आतमध्ये माधुरीला म्हणालो की, आपल्याला भेटून 25 वर्ष होऊन गेली. आता यानिमित्तानं भेटलो. एकदा तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्फेअरचाच पुरस्कार मिळाला होता, हिंदीसाठी..." त्यातच पुढे नाना पाटेकर माधुरीला गंमतीनं म्हणाले की, "तुला कोणतं फिल्मफेयर मिळालेलं? तुला खूप मिळाले असतील मला एकच मिळाला म्हणून माझ्या लक्षात आहे..." नाना पाटेकरांचं हे वाक्य ऐकून माधुरी खळखळून हसली. तसेच, उपस्थितांमध्येही हशा पिकला.
दरम्यान, फिल्मफेयरच्या पुरस्कार सोहळ्यात दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आणि 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित तब्बल 25 वर्षांनंतर भेटले. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यातली ही आयकॉनिक मुव्हमेंट होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
