Nana Patekar On Manisha Koirala : नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मनीषा कोईराला (Manisha Koirala) एकेकाळी नव्वदीच्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. तथापि, त्यांचे ब्रेकअप झालं होतं. अनेक वर्षांनंतर, नानांनी आपल्या मैत्रिणीबद्दल जाहीर भाष्य केलं आहे. नाना पाटेकर यांनी मनीषा कोईरालाच्या हिरामंडीमधील अभिनयाचे कौतुक केले. संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी (Heeramandi) आणि मनीषाच्या अभिनयाने प्रभावित झालो असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. मात्र, मनीषाचा लेटेस्ट नंबर त्यांच्याकडे नसल्याने त्यांनी सांगितले. त्यामुळे ते स्वत: अभिनेत्रीला हे सांगू शकत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. 


नाना पाटेकर यांनी एक्स गर्लफ्रेंड मनीषाचे कौतुक केले


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘हिरामंडी’ ही मालिका मे महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या वेब शोमध्ये मनीषाने मल्लिका जानची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयाला समीक्षक आणि चाहत्यांनी भरभरून दाद दिली. 'द ललनटॉप'शी बोलताना नानांनी मनीषाला 'उत्कृष्ट अभिनेत्री' म्हटले आणि 'तिने खूप चांगले काम केलं.' असल्याचे नमूद केले. शोसाठी तिचे अभिनंदन करण्यासाठी मनीषा कोईरालाशी संपर्क साधला होता का असे विचारले असता? म्हणून नाना काही सेकंद थांबले आणि म्हणाले, मनीषाचा लेटेस्ट नंबर नाही. 


'अग्निसाक्षी'च्या शूटिंगदरम्यान नाना-मनिषा प्रेमात


नाना आणि मनीषा यांनी 1996 मध्ये 'अग्नी साक्षी'मध्ये काम केले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनशिपमध्ये आल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी मनीषाचे विवेक मुशरनसोबत ब्रेकअप झाले होते आणि ती नानांच्या प्रेमात पडली होती. नानांनी आधीच नीलकांतीशी लग्न केले होते. मनीषासोबत अफेअर सुरू असताना ते पत्नीपासून वेगळे राहत होते.


दरम्यान, नानांनी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि इतरांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आणि त्यांचे अनुभव कथन केले. या यादीत मनीषा कोईरालाचेही नाव होते. मनीषाच्या नावावर प्रतिक्रिया देताना नाना म्हणाले, 'महान अभिनेत्री'. कॅन्सरमुळे लहान वयातच खूप काही सहन करावं लागलं ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 


इतर महत्वाच्या बातम्या