एक्स्प्लोर

Nagraj Manjule On Gulshan Grover: लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण

Nagraj Manjule Shares Fan Moment with Gulshan Grover: दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी लहानपणीची आठवण शेअर केली.

Nagraj Manjule Matka King: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित आणि विजय वर्मा अभिनीत 'मटका किंग' (Matka King) ही बहुचर्चित वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या वेब सिरीजमध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.  या धमाकेदार वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरची प्रचंड चर्चा रंगली आहे. 1960 सालची मुंबई यात दाखवण्यात आली आहे. पैसा, सत्ता आणि गुन्ह्यांचा खेळ या विषयावर आधारीत ही वेब सिरीज आहे.  या वेब सिरीजमध्ये विजय वर्मा ब्रृज भाटीची भूमिका साकारत आहे.  ही व्यक्ती जुगारातून भरपूर पैसा कमावते.  क्राइम ड्रामा 'मटका किंग' या वेब सिरीजचा प्रोमोशन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेता विजय वर्मा आणि गुलशन ग्रोवरही उपस्थित होते. या  कार्यक्रमात नागराज मंजुळे यांनी एक लहानपणीची आठवण शेअर केली. 'बॅड मॅन गुलशन ग्रोव्हर यांना लहानपणी सिनेमात पाहिलं होतं', असं नागराज मंजुळे म्हणाले. यावेळी नागराज मंजुळेंनी लहानपणीची आठवण शेअर केली. 

'मी लहानपणीपासून  गुलशन ग्रोव्हर यांना बघत आलो आहे'- नागराज मंजुळे (Nagraj Manjule on Gulshan Grover)

गुलशन ग्रोव्हरबाबत नागराज मंजुळे म्हणाले, 'मी लहानपणीपासून  गुलशन ग्रोव्हर यांना बघत आलो आहे. या वेब सिरीजबाबत जेव्हा अनाऊंसमेंट झाली, तेव्हा या वेब सिरीजचं कास्टिंग झालं नव्हतं.  मी आणि अश्विनीजी कास्टिंगविषयी चर्चा करत होतो. तेव्हा गुलशन ग्रोव्हर पार्टीमध्ये होते. ते माझ्यासमोरुन निघून  गेले होते. मला त्यांना भेटायचं होतं. अश्विनी या गुलशन ग्रोव्हर यांना ओळखत होत्या,  म्हणून मी त्यांना विचारलं की, गुलशन ग्रोव्हर यांना आपण या वेब सिरीजमध्ये घेऊ शकतो का?  त्यांना आपण विचारू शकतो का?  तेव्हा अश्विनीजी हो म्हणाल्या. मी त्यांना अनेक सिनेमांमध्ये पाहिलं आहे, खूप चांगलं वाटलं', असं नागराज मंजुळे म्हणाले.

'मटका किंग' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (Nagraj Manjule Matka King Web Series)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Batamiwala (@marathi_batamiwala)

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'मटका किंग' ही वेब सिरीज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला असून,  2 मिनिट 25 सेकंदाच्या या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. विजय वर्मा अभिनीत ही वेब सिरीज 17 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिरीजमध्ये, सिद्धार्थ जाधव,  सई ताम्हणकर,  गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, कृतिका कामरा,  गुलशन ग्रोव्हर या दिग्गज कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

मटका किंग या वेब सिरीजमधून 1960 साली मुंबईतील  जुगार आणि सट्टेबाजीला मटका हे नाव कसे दिले जाते, हे दाखवण्यात आलं आहे.  'मटका किंग' या वेब सिरिजचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून, सिद्धार्थ रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली अभय कोरणे  यांनी या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

एका चुकीने सगळं गमावलं...; बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडला, 'हा' स्पर्धक संपूर्ण सिझनसाठी झाला नॉमिनेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OTT Action Thriller: OTT वर येतोय थ्रिलरचा बाप! 69 वर्षांचा अभिनेता, जबरदस्त ॲक्शन अन् अंगावर काटा आणेल 'ही' कल्ट सीरिज
OTT वर येतोय थ्रिलरचा बाप! 69 वर्षांचा अभिनेता, जबरदस्त ॲक्शन अन् अंगावर काटा आणेल 'ही' कल्ट सीरिज
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी' अंतिम टप्प्यावर, Top 5 स्पर्धकांची नावं समोर; बॉटम 2 स्पर्धक कोण? कुणाचा प्रवास संपणार?
'बिग बॉस मराठी' अंतिम टप्प्यावर, Top 5 स्पर्धकांची नावं समोर; बॉटम 2 स्पर्धक कोण? कुणाचा प्रवास संपणार?
नवीन लग्न, नवं घर; गौरव मोरेच्या आनंदाच्या क्षणी हास्यजत्रेचे चेहरेच अनुपस्थित; गैरहजेरीमागचं कारण समोर
नवीन लग्न, नवं घर; गौरव मोरेच्या आनंदाच्या क्षणी हास्यजत्रेचे चेहरेच अनुपस्थित; गैरहजेरीमागचं कारण समोर
Mahakumbh Monalisa: महाकुंभ गर्ल मोनालिसाच्या नवऱ्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, लग्न रद्द होणार? नेमकं काय घडलं?
महाकुंभ गर्ल मोनालिसाच्या नवऱ्याविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, लग्न रद्द होणार? नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America Iran Islamabad Talks: इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
इराणच्या प्रतिकारात भंबेरी उडताच ट्रम्पनी जगातील रथी महारथी सोडत शांती वार्तासाठी इस्त्रायल अन् भारताचा कट्टर दुश्मन फक्त पाकिस्तान का निवडला? चकित करणारी इन साईड स्टोरी!
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Embed widget