Muzammil Ibrahim Joins Salman Khans Film SVC63: 'स्पेशल ऑप्स' फेम अॅक्टर मुजम्मिल इब्राहिम (Muzammil Ibrahim) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.   'धोका' आणि 'व्हिल यू मॅरी मी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला कलाकार लवकरच सलमान खानच्या (Salman Khan) आगामी  सिनेमात झळकणार आहे.  सलमान खान आणि नयनतारा यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित फिल्म 'SVC63' या सिनेमात मुजम्मिल इब्राहिम महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. वामसी पैदिपल्ली दिग्दर्शित अॅक्शन पॅक फिल्म सिनेमात  मुजम्मिल इब्राहिमची महत्त्वाची भूमिका असल्याची माहिती, सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Continues below advertisement

या सिनेमातील भूमिकेसाठी मुजम्मिल इब्राहिम प्रचंड उत्साहित आणि एक्सायटेड आहे. 'SVC63' या सिनेमातील भूमिकेवरुन फारसं त्याने भाष्य केलेलं नाही.  त्यानं सांगितलं की, 'माझी भूमिका अॅक्शनने परिपूर्ण आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे', असं मुजम्मिल इब्राहिम म्हणाला.  सलमान खानसोबत काम करतानाचा अनुभव सांगताना मुजम्मिल इब्राहिम म्हणाला, 'सलमान खानसारख्या बड्या कलाकारासोबत स्क्रिन शेअर करणं  मोठी गोष्ट आहे. कोणत्याही कलाकाराला उत्साह वाटेल', असं मुजम्मिल इब्राहिम म्हणाला.

ईद 2027 मध्ये धमाका होणार (Muzammil Ibrahim Joins Salman Khan And Nayantharas SVC63)

वामशी पैदिपल्ली दिग्दर्शित  'SVC63' हा एक बिग बजेट सिनेमा असून,  ही एक अॅक्शन एन्टरटेनर फिल्म आहे.  हा सिनेमा सध्या प्रोडक्शन स्टेजमध्ये असल्याची माहिती आहे.  दिल राजू आणि शिरीष बॅनरखाली तयार करण्यात आलेला हा सिनेमा 2027च्या ईदमध्ये रिलीज होणार असल्याची माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'SVC63' या सिनेमात सलमान खान आणि नयनतारा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  यांसह इतर कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका असल्याची माहिती आहे.   

Continues below advertisement

दरम्यान, मेकर्सने  अद्याप या सिनेमाबाबत कोणतीही गोष्ट उघड केलेली नाही. 'SVC63' या सिनेमाची स्टोरी देखील फिल्ममेकर्सने गुप्त ठेवली आहे. अद्यापतरी कुणीही उघड केलेली नाही.  या आधी  सलमान खानचे काही फोटोस सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, लवकरच या सिनेमाबाबत बऱ्याच माहिती उघड होतील. 

मॉडेलिंग ते अॅक्टिंगपर्यंतचा प्रवास

मुजम्मिल इब्राहिमने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.   यानंतर त्याने अनेक अल्बम गाण्यातही काम केलं. 2007 साली प्रदर्शित झालेली पूजा भट्टची थ्रिलर फिल्म 'धोका' या सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. 'हॉर्न 'ओके' प्लीज' आणि 'व्हिल यू मॅरी मी?' यांसारख्या सिनेमातही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'स्पेशल ऑप्स'मध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?