Munmun Dutta: फिल्मफेअर अवॉर्ड्स 2025च्या रेड कार्पेटवर बॉलिवूडचे एकापेक्षा एक तारे झळकत होते, पण सगळ्यांनाच मागे टाकत ‘बबिता जी’ उर्फ मुनमुन दत्ता यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम मुनमुन दत्ता अवॉर्ड नाइटमध्ये ग्रीन कलरच्या गाऊनमध्ये दिसली आणि तिच्या बंगाली बाला लूकने सगळ्यांनाच थक्क केलं. अवॉर्ड सोहळ्यानंतर मुनमुनने तिच्या रेड कार्पेट फोटोंना सोशल मीडियावर शेअर केलं आणि क्षणार्धात इंटरनेटवर व्हायरल झाली. (Entertainment)

Continues below advertisement

दरवेळी साडी-सूटमध्ये दिसणारी मुनमुन या वेळी अगदी वेगळ्या आणि मॉर्डन स्टाइलमध्ये झळकली. साटन फॅब्रिकच्या फ्लोइंग ग्रीन गाऊनमध्ये ती अप्रतिम दिसत होती. गाऊनचा कॉर्सेट-फिट टॉप आणि स्क्वेअर नेकलाइन तिच्या फिगरला परफेक्ट हायलाइट करत होते. स्लिट असलेल्या स्कर्टमुळे तिच्या लूकमध्ये ड्रामॅटिक टच आला आणि ती रेड कार्पेटवर आत्मविश्वासाने चालताना दिसली. मुनमुनचा हा गाऊन सिंपल पण क्लासी होता ,कुठेही भारी एम्ब्रॉयडरी किंवा स्टोनवर्क नव्हतं, तरीही तिचा ग्रेस आणि चार्म सगळ्यांवर भारी पडला. तिच्या गाऊनच्या स्ट्रॅप डिझाइनमुळे लूक अधिक मॉर्डन वाटत होता.

Continues below advertisement

 

अॅक्सेसरीजमध्ये मुनमुनने गोल्डन टोनमधला नेकपीस आणि राउंड शेप इयररिंग्स निवडले. दोन्ही हातात वेगवेगळ्या डिझाईनच्या स्टेटमेंट रिंग्स घालून तिने लूकला फिनिश दिली. हा ज्वेलरी सेट केवळ वेस्टर्नच नव्हे, तर एथनिक कपड्यांसोबतही सहज जुळेल असं वाटतं. तिच्या स्ट्रॅपी शिमर हील्स आणि ग्रे नेलपेंटने ओव्हरऑल स्टाइलला परिपूर्ण टच दिला. एवढंच नाही, तर लेपर्ड प्रिंटचा क्लच बॅग घेऊन मुनमुनने रेड कार्पेटवरील स्टाइलिश आयकॉन म्हणून स्वतःचं नाव पुन्हा एकदा पक्कं केलं.जर तुम्हालाही पार्टी किंवा फंक्शनसाठी गॉर्जियस पण सिम्पल लूक हवा असेल, तर मुनमुन दत्ताचा हा ग्रीन ग्लॅम गाऊन नक्कीच इन्स्पिरेशन ठरेल.