मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे (Sonakshi Sinha) मॉर्फ केलेले अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरण चांगलेच चर्चेत होते. आता या व्हिडीओ आणि फोटो व्हायरल प्रकरणात दिल्लीतील आर्यन दीपक जैन याला वांद्रा पोलिसांनी अटक करून मुंबईतील कोर्टात हजर केले होते. मात्र, कोर्टाने अटकेच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आरोपीला दिलासा दिला आहे. सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) तक्रारीवरून 13 नोव्हेंबरला मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो शेअर केल्याचा दिल्लीतील आर्यन दीपक जैनवर आरोप आहे. वांद्रे पोलिसांनी 14 नोव्हेंबरला दिल्लीतील शाहदरा परिसरातून आरोपीला अटक केली.(Sonakshi Sinha)
ट्रान्झिट रिमांड न घेता आरोपीला थेट मुंबईतील वांद्रे कोर्टात हजर केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला था. आरोपीला दिल्लीतील स्थानिक न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर न केल्याबद्दल कोर्टाने पोलिसांच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिसांनी 3 दिवसांची कोठडी मागितली; मॉर्फ फोटो तयार करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण शोधायचे असल्याचे कारण दिले. मात्र अटकेच्या प्रक्रियेत BNSS कलम 35 अंतर्गत आवश्यक नियमांचे पालन न झाल्याचे कोर्टाचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे, केवळ पुढील तपासासाठी अटक योग्य ठरू शकत नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. अटकेची प्रक्रिया बेकायदेशीर ठरवत आरोपीची सुटका करण्याचे आदेश; पोलिसांना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(Sonakshi Sinha)
सोनाक्षी सिन्हा यांची मॉर्फ केलेली अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला मुंबईच्या न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. वांद्रे पोलिसांनी आरोपीला दिल्लीतून अटक करून मुंबई न्यायालयात हजर केले होते आणि 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने अटकेच्या प्रक्रियेत कायदेशीर नियमांचे पालन न केल्यामुळे आरोपीला सोडून देण्याचे आदेश दिले आहेत.
Sonakshi Sinha: तक्रार आणि दिल्लीतून अटक
सोनाक्षी सिन्हा यांच्या तक्रारीवरून 13 नोव्हेंबर 2026 रोजी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीतील एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्यांच्या मॉर्फ केलेल्या अश्लील छायाचित्रे शेअर केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे 10:11 वाजता दिल्लीच्या शाहदरा येथील जगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आर्यन दीपक जैन या आरोपीला अटक केली होती. परंतु, आरोपीला मुंबईत आणण्यापूर्वी दिल्लीच्या स्थानिक दंडाधिकारी (मॅजिस्ट्रेट) न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते आणि कोणतीही ट्रान्झिट रिमांडही घेतली नव्हती.
Sonakshi Sinha: वांद्रे न्यायालयाचे ताशेरे
आरोपीला वांद्रे न्यायालयात हजर केल्यानंतर मॅजिस्ट्रेटने अटकेच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. न्यायालयाने म्हटले की, कायद्यानुसार आरोपीला आधी दिल्लीच्या जवळच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात उभे करणे बंधनकारक होते, मात्र पोलिसांनी त्याला थेट दिल्लीतून मुंबईत आणल्याचे दिसते. या कायदेशीर प्रक्रियेचे पालन का करण्यात आले नाही, याबाबत तपास यंत्रणेकडून रेकॉर्डवर कोणतेही समाधानकारक कारण देण्यात आलेले नाही.
Sonakshi Sinha: पोलिसांची कोठडीची मागणी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद
सुनावणीदरम्यान वांद्रे पोलिसांनी आरोपीच्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. अभिनेत्रीची कथित अश्लील मॉर्फ छायाचित्रे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस शोधणे गरजेचे असून इतर पैलूंचीही चौकशी करायची आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
दुसरीकडे, आरोपीचे वकील अमन शाही, प्रशांत त्रिवेदी आणि आदित्य जैन यांनी पोलीस कोठडीच्या मागणीला कडाडून विरोध केला. आरोपीला अटकेपूर्वी कोणतीही आवश्यक नोटीस दिली गेली नाही आणि अटकेचे कारणही सांगण्यात आले नाही, असा आरोप वकिलांनी केला. तसेच, आरोपीला गोपनीय पद्धतीने विमानाने दिल्लीहून मुंबईत आणण्यात आले आणि तक्रारदार प्रभावशाली असल्याने पोलिसांनी घाईघाईने कारवाई केल्याची बाजू बचाव पक्षाने मांडली. आरोपीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
Sonakshi Sinha: BNSS च्या कलमांचे उल्लंघन आणि न्यायालयाचा निर्णय
अटकेच्या नोटीस आणि प्रक्रियेबाबत न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपीवर ज्या गुन्ह्यांचा आरोप आहे त्यात जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 35(1)(b) अंतर्गत ठरवून दिलेले नियम पाळणे आवश्यक असते, ज्यामध्ये अटकेच्या आवश्यकतेची कारणे नोंदवणे देखील समाविष्ट आहे.
तपास अधिकाऱ्यांनी या कायदेशीर नियमांचे योग्य प्रकारे पालन केल्याचे रेकॉर्डवरून स्पष्ट होत नाही. केवळ पुढील तपासाची गरज आहे या कारणास्तव कोणालाही अटक करून कोठडीत ठेवणे योग्य ठरू शकत नाही, विशेषतः जेव्हा अटकेची अनिवार्य कायदेशीर प्रक्रियाच पाळली गेलेली नाही. याच मुद्द्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीची अटक बेकायदेशीर ठरवत त्याला रिहा करण्याचे आदेश दिले आणि पोलिसांना योग्य कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश दिले.
