Mulshi Pattern Actor Om Bhutkar: 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern) या सिनेमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच ओम भूतकर (Om Bhutkar) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.  अलिकडेच  त्यानं लग्नगाठ बांधली.  अभिनेत्याच्या (Entertainment) लग्नाचे फोटो समोर  आल्यानंतर  नेटकरी तसेच त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. अभिनेत्याने खरंच लग्नबंधणात अडकला आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच,  ओमची बायको नक्की आहे तरी कोण? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.   दरम्यान, नुकतंच  पर्ण पेठ हिनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ओमला शुभेच्छा देताना तिनं ओमच्या बायकोचंही नाव सांगितलं आहे.

Continues below advertisement

ओम भूतकरच्या पत्नीचं नाव काय? (Marathi Actor Om Bhutkar Marriage) 

Continues below advertisement

ओम भूतकरच्या लग्नाला अनेक कलाकार मंडळी पाहुणे म्हणून उपस्थित होते. या लग्नात पर्ण पेठे देखील उपस्थित होती. तिनं ओम भूतकरच्या लग्नातील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये  ओम आपल्या पत्नीसह दिसत आहे.  पर्णने ओमच्या लग्नातील रिसेप्शनमधील फोटो शेअर केले आहेत.  ओमने आपल्या आयुष्यातील खास प्रसंगी पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर फेटा बांधला होता.  त्याच्या पत्नी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. दोघेही पारंपारिक लूकमध्ये सुरेख दिसत होते.   

ओम भूतकरच्या पत्नीने गुलाबी रंगाची साडी गुजराती पद्धतीने नेसली होती.  तर, हातात लाल रंगाच्या बांगड्या होत्या.  अभिनेत्री पर्ण पेठे  हिनं  इन्स्टाग्रामवर त्यांच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. तसेच तिनं कॅप्शनमध्ये शुभेच्छा देत ओम आणि त्याच्या पत्नीला टॅग केलं आहे.  त्याच्या पत्नीचं नाव प्रेरणा सेठिया असे असल्याची माहिती  समोर आली आहे.  

ओम भूतकरची बायको प्रेरणाने आपल्या इन्स्टाग्राम बायकोमध्ये Wildlife Conservationist असं लिहिलं आहे. म्हणजेच ती  वन्यजीव संवर्धनासाठी काम करत असल्याची माहिती आहे.    प्रेरणा Freeland globalशी संलग्न असून,  पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. तर, ओम भूतकर हा मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार असून, त्याचा 'देऊळ बंद 2' आणि 'तुंबाडची मंजुळा' या दोन्ही सिनेमे चर्चेत आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी