Mukul Dev Passed Away : बॉलिवूडमधून एक वाईट बातमी समोर आलीये. ‘सन ऑफ सरदार’, ‘आर..राजकुमार’, ‘जय हो’ सारख्या सिनेमांमध्ये केलेले प्रसिद्ध अभिनेते मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांचं निधन झालंय. मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांनी 23 मे रोजी रात्री अखेरचा श्वास घेतलाय. फार कमी लोकांना माहिती आहे की, सिनेमांत उत्कृष्ट भूमिका करुन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले मुकुल देव हे एक पायलट देखील होते. मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांची सिनेक्षेत्रात एन्ट्री कशी झाली? जाणून घेऊयात..
मुकुल देव यांनी घेतली होती कमर्शियल पायलटची ट्रेनिंग
मुकुल देव (Mukul Dev Passed Away) टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेते होते. देव यांचं करिअर मोठं आहे. त्यांनी अनेक सिनेमे आणि टिव्ही शोमध्ये काम केलंय. मात्र, तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, ते सिनेक्षेत्रात येण्यापूर्वी एक पायलट देखील होते. त्यांनी कमर्शियल पायलटची ट्रेनिंग पूर्ण केली होती. त्यामुळेच त्यांनी ग्लॅमरस जगाकडे आगेकुच केली होती.
मुकुल देव यांची सिनेक्षेत्रातील सुरुवात कोणत्या मालिकेने?
मुकुल देव (Mukul Dev Passed Away) यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1996 मध्ये 'मुमकिन' या टीव्ही मालिकेने झाली. यानंतर, ते दूरदर्शनच्या 'एक से बधकर एक' या कॉमेडी शोमध्ये दिसले आणि छोट्या पडद्यावर एक खास ओळख निर्माण केली. त्यानंतर या अभिनेत्याने 'कहीं दिया जले कहीं जिया' आणि 'कहानी घर घर की'सह अनेक मालिकांमध्ये काम केले.
टिव्ही मालिकांमध्ये नाव कमावलं अन् बॉलिवूडमध्ये काम मिळू लागलं
टीव्ही मालिकांमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर, मुकुल यांनी 'दस्तक' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर प्रवेश केला. या चित्रपटात त्याने एसीपी रोहित मल्होत्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि 'यमला पगला दीवाना', 'सन ऑफ सरदार' आणि 'आर राजकुमार' सारख्या चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. मुकुल यांनी फियर फॅक्टर इंडिया सिझन 1 देखील होस्ट केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या