एक्स्प्लोर

Mukesh Khanna On SHarmila Tagore: 'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...

मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्या लग्नाचा संदर्भ दिला. लग्नानंतर शर्मिला टागोर ‘आयशा बेगम’ झाल्या आणि आता त्या दुसऱ्या धर्मातील लोकांच्या भावनांची चिंता करत आहेत, असं ते म्हणाले.

Mukesh Khanna on Sharmila Tagore Vande Mataram Remark: ‘वंदे मातरम्’वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अन् भाजप खासदार कंगना रनौतनंतर आता अभिनेता मुकेश खन्ना यांनी अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या कथित वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या विचारांवरच सवाल उपस्थित केले आहेत. ‘द फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी शर्मिला टागोर यांच्या लग्नाचा संदर्भ दिला. लग्नानंतर शर्मिला टागोर ‘आयशा बेगम’ झाल्या आणि आता त्या दुसऱ्या धर्मातील लोकांच्या भावनांची चिंता करत आहेत, असं ते म्हणाले.

काय म्हणाले मुकेश खन्ना?

ते म्हणाले 'तुमच्या बंगालमध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात 'काली पूजा' होते, तेवढी दुसरीकडे कुठेही होत नाही. तुम्ही ते बघत मोठा झाला आहात. आज तुम्हाला असं लक्षात येतंय की, एखाद्या धर्मातला व्यक्ती 'वंदे मातरम'ला स्वीकारणार नाही. यापूर्वी तुमचं हे लक्षात आलं नव्हतं. 'लग्नानंतर नवाबची बेगम झालात त्यानंतर तुम्हाला हे कळलं का?' तेव्हा तुम्हाला कळलं का की अरे मुस्लिम धर्म पण आहे.आयेशा बेगम नाव होतं त्यांचं. आयुष्याला बाजूला ठेवलं शर्मिला म्हणून पुढे गेल्या.जे फायद्याचं होतं ते केलं.लग्नासाठी आयेशा बेगम बनल्या. पण आता तुम्ही बोलताय आयुष्या बेगम म्हणून. आज तुम्हाला मुस्लिम धर्म कळतोय.हिंदू धर्म विसरलात का तुम्ही ? असा सवाल अभिनेते मुकेश खन्ना यांनी केला.

हिंदू धर्माबाबतही मुकेश खन्नांनी मांडलं मत

याच मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी हिंदू धर्मातील देवी-देवतांबाबतही आपलं मत मांडलं. हिंदू धर्मात 33 कोटी देवी-देवतांचा उल्लेख केला जातो, मात्र त्याचा अर्थ 33 कोटी वेगवेगळे देव आहेत असा होत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, ईश्वर निराकार आहे. भक्त आपल्या श्रद्धेनुसार त्याला राम, कृष्ण, शिव किंवा हनुमानाच्या रूपात पाहू शकतो.  शर्मिला टागोर असं म्हणाल्या होत्या की, "भारतात अनेक धर्म आणि श्रद्धा मानणारे लोक राहतात. त्यापैकी अनेक जण अनेक देवतांऐवजी एका ईश्वरावर विश्वास ठेवतात. वंदे मातरम मधील काही कडव्यांमध्ये अनेक दैवतांची स्तुती करण्यात आली आहे." 

‘वंदे मातरम्’वर काय म्हणाले मुकेश खन्ना?

‘वंदे मातरम्’च्या वादावर बोलताना मुकेश खन्ना म्हणाले की, या गीताला होणारा विरोध केवळ त्यात देवी-देवतांचा उल्लेख असल्यामुळे नाही. काही लोकांची अशीही भूमिका आहे की, ते देवाशिवाय इतर कोणासमोरही नतमस्तक होऊ शकत नाहीत, असा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी ए. आर. रहमान यांच्या ‘मां तुझे सलाम’ या गाण्याचं उदाहरण दिलं. या गाण्यातही देशाला आई मानून तिला सलाम केला जातो, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी असंही म्हटलं की कोणालाही जबरदस्तीने नतमस्तक होण्याची सक्ती केली जाऊ नये. 

कंगनानेही केलेला शर्मिला टागोरांना विरोध

शर्मिला टागोर यांनी 'वंदे मातरम्' मधील काही ओळींवर आक्षेप घेतला होता. त्यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री व खासदार कंगना रनौतने नाराजी व्यक्त केली. 'कृपया हिंदू मुस्लिम मानसिकतेच्या पलीकडे या, असं म्हणत त्यांनी पोस्टच्या शेवटी शर्मिला टागोर यांच्याबद्दल आपुलकी व्यक्त करत, चला एकमेकांना आपलंसं करून मिठी मारूया, असं कंगनाने म्हटलं. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Case : 'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
'तुझी जागा तुरुंगातच आहे', चेक बाउंस प्रकरणात राजपाल यादववर सर्वोच्च न्यायालय संतप्त, याचिका फेटाळण्याचा इशारा
Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात; अलनिनोच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पाण्याचे सूक्ष्म नियोजन, गिरीश महाजनांनी दिली माहिती
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Embed widget