Mrunal Thakur Breakup Roumers: मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपच्या अफवांमुळे मनोरंजन वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मृणाल ठाकूर आणि सुप्रसिद्ध साउथ अभिनेता धनुष (Dhanush) यांच्या नात्याची मधल्या काळात जोरदार चर्चा होती.'तेरे इश्क मे' या सिनेमाच्या प्रमोशन वेळी धनुष आणि क्रिती सेननसोबत मृणाल ठाकूरही दिसली होती. नंतर स्क्रीनिंगच्या वेळेस धनुष आणि मृणाल एकत्र दिसलेले. त्यामुळे त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत. अभिनेता धनुषचा गेल्या वर्षी पत्नी ऐश्वरासोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्याचं मृणाल सोबत नाव जोडलं जात होतं. दोघे लग्न करणार अशी चर्चाही सुरू झाली होती.  मात्र आता दोघांचे मार्ग वेगळे झाल्याची चर्चा आहे.

Continues below advertisement

मृणाल ठाकूर धनुषचं ब्रेकअप?

आता धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना आणखी एक अनपेक्षित वळण मिळाले आहे. त्या दोघांच्या कथेत नात्याबद्दल अनेक महिन्यांच्या अटकळीनंतर दोघांचं ब्रेकप झाल्याचं बोललं जात आहे. फिल्मफेअरच्या माहितीनुसार धनुष आणि मृणाल यांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.मृणालने अनेकदा या सगळ्या अफवा असल्याचा स्पष्ट केलेलं. मात्र धनुषने या सगळ्या प्रकारावर न बोलणंच पसंत केलं.

खरंतर अजय देवगण सोबत मृणाल मुख्य भूमिकेत असलेल्या 'सन ऑफ सरदार 2 ' या चित्रपटाच्या प्रीमियरला धनुषने हजेरी लावली होती. या चित्रपटाशी त्याचा कोणताही संबंध नसताना तो तिथे हजर होता. नंतर तो मृणालला भेटला. त्या दोघांचा एकमेकांना भेटतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.या व्हिडिओमधील त्यांच्यातील केमिस्ट्री पाहून अनेकांनी त्या दोघांच्या नात्याविषयी चर्चा करायला सुरुवात केली. दरम्यान मृणाल धनुष्य 'तेरे इश्क में ' या चित्रपटाच्या पार्टीमध्येही दिसली होती. शिवाय तिने instagram वर धनुष च्या बहिणीला फॉलो केल्यानं धनुष आणि मृणालच्या कथित नात्याविषयीच्या चर्चांना आणखी हवा मिळाली.दरम्यान फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, या कलाकारांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार धनुष आणि मृणाल या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. दोघांनीही कधीही त्यांचं नातं सार्वजनिक न केल्यामुळे ब्रेकपचा हा दावा अनिश्चित आहे.

Continues below advertisement