Mrunal Thakur Social Media Viral Video: बॉलीवूड गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरची (Mrunal Thakur) सध्या एकच चर्चाय. तिचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओत मृणालला पोलीस व्हॅनमधून हातकड्या घालून व्हॅनमधून बाहेर काढताना दिसत आहेत.  तिच्या हातात बेड्या दिसतायत. तिच्या मागून काही पोलिसही उतरताना दिसतात. हा व्हिडिओ पाहताच चाहते हैराण झाले आहेत. अभिनेत्री म्हणाल ठाकूरला अटक झालीय का? नेमकं काय घडलंय ? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. पण व्हिडिओ पाहताच चाहत्यांना कारण कळलं. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.  तिच्यासोबत दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप ही दिसतोय त्यामुळे काहीतरी नवीन येणार याचा अंदाज चाहत्यांनी बांधलाय.

Continues below advertisement

नेमकं झालं काय ?

हा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात मृणालच्या आगामी ‘Dacoit’ चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यासाठी हा अनोखा आणि थोडासा धक्कादायक मार्केटिंग प्लॅन आखला होता. या चित्रपटात आदिवी सेश आणि मृणाल ठाकूर लीड रोलमध्ये आहेत, तर प्रकाश राज आणि अनुराग कश्यप महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शन शनैल देव यांनी केलं असून हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

जबरदस्त ॲक्शन, प्रेम विश्वासघात सूडाचा कॉम्बो

‘Dacoit’ हा केवळ रोमँटिक चित्रपट नसून प्रेम, विश्वासघात आणि सूड यांचा जबरदस्त कॉम्बो आहे.या सिनेमाचा ट्रेलरही आलाय. ट्रेलरमध्ये एक शांत लव्ह स्टोरी अचानक धक्कादायक वळणावर जाताना दिसते. चित्रपटात जेलमधून पळून जाणं, पोलिस ट्रान्सफर, हाय-स्पीड चेस असे थरारक अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर मुख्य पात्रांमधील भावनिक संघर्षही कथेला अधिक खास बनवतो. मृणालचा कॅरेक्टर खूपच स्ट्राँग दाखवण्यात आलं आहे. जिथे ती एकीकडे भावनिक आहे, तर दुसरीकडे खूपच ठाम आणि धाडसी दिसते.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया 

या प्रमोशनल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही चाहते सुरुवातीला घाबरले, तर काहींनी लगेचच हा प्रमोशनल स्टंट असल्याचं ओळखलं. अनेकांनी या क्रिएटिव्ह आयडियाचं कौतुक केलं, तर काहींनी मजेशीर कमेंट्सही केल्या. ‘Dacoit’ हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी भाषेत एकाच वेळी शूट करण्यात आला असून 10 एप्रिलला तो विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.