Money Heist: जगभरातील OTT प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावणाऱ्या मनी हाइस्टच्या चाहत्यांसाठी Netflix ने मोठी हिंट दिलीय. (Money Heist Season 6)OTT विश्वात धुमाकूळ घालणाऱ्या या सुपरहिट स्पॅनिश वेबसीरिजच्या सहाव्या सिझनबाबत आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण ठरलंय नेटफ्लीक्सचा नवीन टीझर आणि स्पेनमध्ये करण्यात आलेला भव्य प्रमोशनल इव्हेंट.या व्हिडीओनंतर प्रोफेसर, टोकियो, नायरोबी, रकेल आणि बर्लिनसारख्या लोकप्रिय पात्रांची पुन्हा एंट्री होणार का? याबाबत चर्चा रंगली आहे.
मनी हाइस्ट ही एक स्पॅनिश भाषेतील क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे. यात प्रोफेसर वेगवेगळ्या लोकांची टोळी जमवतो. आणि ते सगळे मिळून स्पेनच्या रिझर्व बँकवर दरोडा घालतात. प्रेक्षकांना या सिरीजने प्रचंड खेळवून ठेवले होते. या वेब सिरीज ची लोकप्रियता संपूर्ण जगभरात आहे.
Money Heist चा सहावा सिझन येणार?
OTT वरील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिजपैकी एक असलेल्या मनी हाइस्टच्या नव्या सीझनबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. 2019 मध्ये सुरू झालेल्या या स्पॅनिश सीरिजचा पाचवा सीझन 2022 मध्ये रिलीज झाला होता आणि त्यालाच अंतिम सीझन मानलं गेलं होतं. मात्र मूळ कथा संपल्यानंतर तब्बल चार वर्षांनी Netflix ने स्पष्ट संकेत दिले आहेत की मनी हाइस्टची कथा अजून संपलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा उत्सुकता निर्माण झाली आहे.
रविवारी नेटफ्लिक्स ने त्यांच्या अधिकृत x हॅण्डल वर एक नवीन ट्विट शेअर केले. वेट वीट मध्ये मनी हाइस्टचा एक टीझर आहे. या टीचर मध्ये मागील पाचही सीजनचे मॉन्टेज दाखवण्यात आले आहेत. या टीचर च्या कॅप्शनमध्ये 'क्रांती अजून संपलेली नाही ' असं लिहिलंय. 'ला कासा दे पोपेल' चे जग सुरूच आहे. या टॅगलाईनमुळे मनी हाइस्ट चा सहावा सीजन लवकरच नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होण्याची चर्चा रंगली आहे. यटमिटमध्ये सहाव्या सीजन चा स्पष्ट उल्लेख नसला तरी नेटफ्लिक्स ने दिलेले आहे या सिरीजच्या चाहत्यांची उत्सुकता शी गेला पोहोचली आहे.
रविवारी Netflix ने एक खास अनाउन्समेंट व्हिडीओ शेअर केला. त्याआधी 9 मे रोजी स्पेनमधील सेव्हिल शहरात एक भन्नाट स्टंट करण्यात आला.नदीकिनारी हजारो प्रेक्षक जमले होते. नदीतून एक बोट जात होती आणि त्यामध्ये ‘मनी हाइस्ट’मधील लाल जंपसूट आणि मास्क घातलेले लोक दिसत होते. पार्श्वभूमीला ‘बेला चाओ’ गाणं वाजत होतं. या इव्हेंटमुळे फ्रँचायझी अजूनही जिवंत असल्याची हिंट देण्यात आली.
आकडेवारीतही ‘मनी हाइस्ट’चं वर्चस्व
Netflix च्या मते, मनी हाइस्टचे तीन सीझन अजूनही ‘नॉन-इंग्लिश सीरिज’च्या टॉप 10 यादीत अनुक्रमे चौथ्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत.2023 ते 2025 दरम्यान या फ्रँचायझीचे वेगवेगळे सीझन मिळून तब्बल 1.3 अब्ज तास पाहिले गेले. म्हणजेच जवळपास 16 कोटी वेळा ही सीरिज स्ट्रीम झाली.
