Mohit Suri And Ram Gopal Verma: मोहित सुरी (Mohit Suri) हे बॉलिवूडमधील दिग्गज नावांपैकी एक. 'सैयारा' (Saiyaara) या सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आणि रातोरात त्यांना प्रसिद्धी मिळाली. 2025 साली 'सैयारा' हा सिनेमा रिलीज झाला होता. दोन कलाकारांना त्यांनी या चित्रपटातून लाँच केलं. या सिनेमातून या दोन्ही कलाकारांना (Bollywood) विशेष प्रसिद्धी मिळाली. बॉक्स ऑफिसवरही (Box Office Collection) 'सैयारा' या सिनेमाने जबरदस्त कामगिरी केली. 500 कोटींचा बिझनेस करत या सिनेमाने नवा रेकॉर्ड तयार केला. बॉलिवूडमधील हा सिनेमा सर्वात रोमँटिक चित्रपटांपैकी एक ठरला. 'सैयारा'नंतर मोहित सुरी आणखी कोणता नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. दरम्यान, एक मोठी अपडेट समोर आली आहे. मोहित सुरी लवकरच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत एक दिमाखदार सिनेमा तयार करणार आहेत. अशी घोषणा त्यांनी स्वत: केली आहे.
मोहित सुरी राम गोपाल वर्मांसोबत आगामी प्रोजेक्टसाठी काम करणार (Mohit Suri Joins hand with Ram Gopal Varma for a Gangster Film)
अलिकडेच राम गोपाल वर्मा आणि मोहित सुरी यांनी आपला सेल्फी अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. सेल्फी शेअर करुन त्यांनी एकत्रित आपल्या कामाची घोषणा केली. मोहित सुरी आणि राम गोपाल वर्मा या दोघांनीही हा सेल्फी शेअर केला आहे. राम गोपाळ वर्माने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'लव डिश फुल ऑफ गँगस्टर करी. याची माहिती लवकरच देणार' असं लिहिलं आहे. तर, दुसरीकडे मोहित सुरी यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच राम गोपाळ वर्मा यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुकता दर्शवली.
मोहित सुरी यांनीही दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. मोहित यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'राम गोपाल यांचे चित्रपट पाहून फिल्ममेकर बनण्याचे स्वप्न पाहण्यापासून ते आता त्यांच्यासोबत सिनेमा बनवण्यापर्यंत, तेही इंडस्ट्रीतील ओरिजनल गँगस्टर राम गोपाल वर्मा यांच्यासोबत... काही प्रवास तिथेच संपतात, जिथून आपण सुरुवात करतो. या सिनेमाची कल्पना थेट हृदयातून आली आहे', असं त्यांनी म्हटलंय. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गँगस्टर चित्रपट तयार केले. सत्या, कंपनी, सरकार यांसारखे चित्रपट त्यांनी तयार केले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
