Mohan Joshi On Hindi Film Industry: मोहन जोशी (Mohan Joshi) हे मराठी रंगभूमी (Marathi Theatre), चित्रपट (Marathi Movie) आणि दूरदर्शन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी, भोजपुरी आणि इतर भाषांमधील सिनेमांमध्येही काम केलंय. दमदार व्यक्तिमत्त्व आणि भूरळ पाडणाऱ्या अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांना भूरळ घातली. विशेषतः हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिकांमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. 'गंगाजल', 'गुंडा', 'मृत्यूदंड', 'गुंडाराज', 'बिल्ला नंबर 786', 'अंत' अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी आजवर काम केलंय. पण, हिंदी सिनेसृष्टीत एवढी दमदार कारकीर्द असूनही त्यांनी हिंदीत फारसे मित्र बनवले नाहीत, असं सांगितलं. 

Continues below advertisement

नुकतीच मराठी अभिनेते मोहन जोशी यांनी 'मित्र म्हणे', या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना मोहन जोशींना त्यांनी आजवर हिंदीत केलेल्या कामाचा अनुभव विचारण्यात आला. यावर बोलताना मोहन जोशी यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. तसेच, हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सांगायचं झालं तर, उगवत्या सूर्याला नमस्कार…, असंही ते म्हणाले. 

मराठी अभिनेते मोहन जोशी नेमकं काय म्हणाले? (Mohan Joshi On Hindi Films)

Continues below advertisement

मराठी अभिनेते मोहन जोशी म्हणाले की, "तेव्हा माझ्याकडे 'सिनेमा' नावाचं मासिक यायचं. त्यात संबंधित महिन्यात रिलीज होणाऱ्या सगळ्या सिनेमांची यादी यायची तसेच चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत, त्यांची नावंही दिली जायची. माझ्या आईला सवय होती… मोहन जोशी असं नाव दिसलं की, ती माझ्या नावाखाली अंडरलाईन करायची. एका मासिकामध्ये असे माझे 28 सिनेमे होते. तिने सगळीकडे माझं नाव अंडलाईन करून ठेवलं होतं. मी तेव्हा चिक्कार काम करायचो… कामाची खरंच कमी नव्हती..."

"हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल सांगायचं झालं तर, उगवत्या सूर्याला नमस्कार… तुमच्याकडे काम असेल तर वाहवा करतील, मराठीतही तेच आहे. एकंदर सगळीकडे तेच आहे... त्यामुळे मैत्री वगैरे या सगळ्यापासून मी जरा दूरच राहिलो. मित्र बनवले नाहीत. पण, मराठीत खऱ्या अर्थानं माझे चांगले मित्र झाले ते म्हणजे अतुल परचुरे, विनोद पंडित आणि अशोक शिंदे हे तिघं माझे जवळचे मित्र! अमेरिकेत मला दीपक करंजीकर भेटले. मात्र, हिंदीत मी सर्वांपासून लांबच राहिलो. कारण, अनेक उदाहरणं मी पाहिली होती… ए. के. हंगल, राजेश खन्ना असे बरेच कलाकार आहेत. कलाकाराकडे काम नसेल तर कुणीही विचारत नाही...", असं मोहन जोशी यांनी सांगितलं.