Mohammed Siraj Affair Rumours: क्रिकेट (Cricket News) आणि बॉलिवूड (Bollywood News) हे न तुटणारं समीकरण, आजवर इथे अनेकांचं सूत जुळलं, तर अनेकांचं नातं तुटलं. अनेक क्रिकेटपटूंनी सुपरस्टार अभिनेत्रींसोबत (Superstar Actress) आपली लग्नगाठ बांधली आहे. अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli), सागरिका घाटगे (Sagarika Ghatge) आणि जहीर खान (Zaheer Khan) या जोड्याही अशाच जुळल्या आणि सध्या इंडस्ट्रीतले पॉवर कपल म्हणून ओळखल्या जातात. अशातच आता यांच्यासोबत आणखी एक जोडी जुळण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. सध्या त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चाही रंगल्या आहेत. तशा चर्चा खूप दिवसांपासूनच रंगलेल्या, पण, नकुत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओनं चर्चांना आणखी दुजोरा मिळाला आहे.
टीम इंडियाचा धडाकेबाज खेळाडूचं आणि एका टेलिव्हिजन अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून 'बिग बॉस' फेम माहिरा शर्मा (Mahira Sharma) आहे. तर ज्या क्रिकेटपटूच्या चर्चा सुरू आहेत, तो भारतीय क्रिकेटपटू म्हणजे, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj). माहिरा शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. त्यासाठी कारण ठरलाय त्यांचा व्हायरल होणारा व्हिडीओ.
नुकतीच माहिरा शर्मा मुंबईतील एका कॅफेबाहेर स्पॉट झाली. माहिरा त्याच कॅफेबाहेर दिसली, जिथे मोहम्मद सिराजही दिसला होता. हे दोघेही एकाच कॅफेबाहेर पडताना स्पॉट झाल्यामुळे दोघांचं नाव जोडलं जात आहे. दोघेही जरी ते सोबत नसले, तरी एकाच वेळी एकाच ठिकाणी ते उपस्थित असल्याचं पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा एकच कल्लोळ माजला. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये हे दोघेही स्वतंत्रपणे वावरताना दिसले. सिराज बाहेर चाहत्यांशी संवाद साधताना दिसला, तर माहिरा कॅफेमधून बाहेर पडून थेट आपल्या गाडीच्या दिशेनं जाताना दिसली. पण, दोघेही एकाच वेळी, एकाच कॅफेबाहेर दिसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
'को-इंसिडेंस' की 'कनेक्शन'? (Mohammed Siraj, Mahira Sharma)
दोघेही एकाच कॅफेबाहेर, एकाच वेळी स्पॉट झाल्यामुळे जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, अनेकांनी तर वेगवेगळ्या रिअॅक्शन्स द्यायला सुरुवात केली आहे. तसेच, अनेकांनी तर ठरवूनच टाकलंय की, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
माहिरा, सिराजच्या रिलेशनशिपच्या अफवा कशा सुरू झाल्या?
2024 मध्ये दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केलेलं. दोघांनी एकमेकांच्या पोस्टवर केलेल्या लाईक्स आणि कमेंट्सनाही चाहत्यांनी नोटीस केलं. त्यानंतर काहीच दिवसांत सोशल मीडियावर दोघांच्या डेटिंगच्या अफवांनी जोर धरला. माहिरानं एका मुलाखतीत बोलताना म्हटलेलं की, "मी कुणालाच डेट करत नाहीय..." तर, सिराजनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या सर्व अफवा असल्याचं म्हटलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
