Model Divyanshu Joshi Died: एका दुःखद बातमीनं मनोरंजन विश्वात खळबळ माजली आहे. 26 वर्षांच्या सुप्रसिद्ध मॉडेलचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झालाय. मूळचा मॉडेल दिव्यांशू जोशीचा (Divyanshu Joshi) केरळमध्ये (Keral) एका फोटोशूटवेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना 28 मे रोजी घडली. ज्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री हादरली आहे. दिव्यांशू जिथे शूटसाठी गेला होता, ती एक खाण असून गेल्या 20 वर्षांपासून बंद आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव तिथे जाण्यासही बंदी आहे. तरीसुद्धा दिव्यांशू (Model Divyanshu Joshi) तिथे फोटोशूटसाठी गेला आणि दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. 

Continues below advertisement

दिव्यांशू जोशी दिल्लीहून केरळला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी गेला होता. एर्नाकुलममधील एका विशिष्ट ठिकाणी त्याला शुटिंग करायचं होतं. जोशी आणि त्याचा एक मित्र त्या ठिकाणी गेले, हे ठिकाण अत्यंत धोकादायक मानलं जातं. याच ठिकाणी दिव्यांशू जोशीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिल्लीचा मॉडेल असलेल्या दिव्यांशू जोशीच्या मृत्यूमुळे केरळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खाणीमध्ये मृत्यूच्या अनेक घटना घडल्यामुळे, गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून ती बंद ठेवण्यात आली होती. त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

व्हिडीओ शुटिंग करणाऱ्या मित्रांनी सावधगिरीचा इशारा दिला, तरीसुद्धा...

Continues below advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांशू जोशी खाणीच्या पाण्यात उतरला आणि त्याचा पाय घसरला असावा. अवघ्या काही क्षणातच त्याचा तोल गेला. त्यावेळी त्याचे तिथेच उपस्थित शुटिंग करत असलेल्या त्याच्या मित्रांनी जवळच्या रहिवाशांना मदतीसाठी बोलावलं आणि त्या रहिवाशांनी पुढे अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. आपत्कालीन कॉल मिळताच, अग्निशमन आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांशू जोशीला सुमारे 30 फूट खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं आणि पेरुंबावूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

खाण 20 वर्षांपूर्वीच बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खाण गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून बंद आहे. हा परिसर अत्यंत धोकादायक मानला जातो. काही भागांमध्ये पाण्याची खोली साधारणपणे 100 फुटांपर्यंत आहे. प्राथमिक तपासातून असं समोर आलंय की, सोशल मीडियावर या खाणीचे जे एरियल व्हिडीओ व्हायरल होत होते, त्यामुळेच या ग्रुपनं फोटोशूटसाठी हे ठिकाण निवडलं असावं. स्थानिक पंचायत अध्यक्षा शिमी वर्गीस यांनी नमूद केलं की, हे ठिकाण धोकादायक असल्याचं बऱ्याच काळापासून ओळखलं जातं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Social Media Influencer Found Dead: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून हुंड्यासाठी छळ? लग्नाच्या दीड वर्षांतच बायकोचा संशयास्पद शेवट, स्कॉर्पिओसाठी छळ केल्याचा आरोप

ABP माझाच्या बातम्या LIVE...