Shahrukh Khan Fame Mitwa Singer: सिंगर शफकत अमानत अली (Shafqat Amanat Ali) सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गायकाने आपल्या कारकिर्दीत बऱ्याच गाण्यांना आपला आवाज दिला आहे. 'कभी अलविदा ना कहना' (kabhi alvida na kehna) या सिनेमातील 'मितवा' (Mitwa) हे गाणं आपल्याला आठवत असेल. ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी होते. या गाण्यामुळे शफकत अमानत अलीला जगभरात ओळख मिळाली. हा गायक बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर आहे. भारतातही दिसला नाही. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला. त्याला ब्लड कॅन्सरचे (Blood cancer) निदान झाले होते. ज्यामुळे त्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
शफकत अमानत अलीला झालाय ब्लड कॅन्सर, स्वत:च आजारपणाबद्दल सांगितलं (Shafqat Amanat Ali Reveals Battle With Blood Cancer)
गायक शफकत अमानत अली सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितलं की, त्याला ब्लड कॅन्सरचे निदान झाले आहे. गायकाने त्याची हेल्थ अपडेट दिली आहे. शफकत अमानत अली याने सांगितलं की, ''मल्टिपल मायलोमा' नावाचा रक्ताचा कर्करोग झाला आहे. पण आता प्रकृती खूप सुधारली आहे. या आजारामुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. वर्षभर उपचार सुरू होते. तसेच बोन मॅरो बायोप्सीचे रिपोर्ट क्लिअर आले आहे, हे एक चांगले लक्षण आहे. मी आता धोक्याबाहेर आहे', असं गायकाने सांगितले. शफकत अमानत अली याच्यावर अजूनही आठवड्यातून एकदा केमोथेरपी केली जाते. आता त्याच्यावर ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होणार आहे. ज्यानंतर गायक पूर्णपणे बरे होतील.
पाकिस्तानी गायकाच्या म्हणण्यांनुसार, 'या आजारापणामुळे मी संगीत जगतापासून दूर होतो. पण आता परत येण्यास तयार आहे'. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायकाचा कॉन्सर्ट 28 नोव्हेंबर 2026 रोजी कराचीमध्ये होणार आहे. त्यानंतर लाहोर आणि इस्लामाबादमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्याने यावेळेस कॅन्सरसारख्या आजारांबद्दल जागरुक राहण्याचे चाहत्यांना आवाहन केले आहे. जर शरीरात कुठेही वेदना होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करु नका, असे गायकाने आवाहन केले आहे. गायकाने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यातच ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते. त्यामुळे वेळेवर उपचार करण्यात आले, असंही सिंगरने सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
