Mithi River Scam : अभिनेता डिनो मोरिया (Actor dino morea) याची मिठी नदीच्या घोटाळा प्रकरणाती मुंबी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. डिनो मोनिरा (Actor dino morea) आज (दि.26) मुंबई पोलिसांसमोर हजर झालाय. मोरिया चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता  ईओडब्ल्यू कार्यालयात आल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. ईओडब्ल्यूने या प्रकरणाबाबत डिनोचा भाऊ सँटिनो मोरिया याचीही चौकशी केली होती. मिठी नदी घोटाळा प्रकरणाशी डिनो मोरियाचा (Actor dino morea) काय संबंध आहे ते येथे जाणून घेऊया?

ईओडब्ल्यूच्या सूत्रांनुसार, तपासकर्त्यांना असे आढळून आले आहे की, मिठी नदी घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमने बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी अनेक फोनवरून संभाषण केले आहे. यानंतर, आज पोलिसांनी मोरिया यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले. सध्या, पोलिस मुख्य आरोपीसोबत डिनो आणि त्याच्या भावाचे काय संभाषण झाले याचा तपास करत आहेत.

आरोपीशी संबंधित कॉल रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणादरम्यान डिनो मोरियाचे नाव पुढे आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्याची  सहभाग आणि दोन्ही पक्षांमधील व्यवहारांची माहिती पुष्टी करण्यासाठी त्याची चौकशी करण्यात आली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मिठी नदीचा घोटाळा नेमका काय? 

या घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याची यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या मशिनरीसाठी कदम आणि सह-आरोपी जय जोशी यांनी महापालिकेकडून जास्त दर आकारल्याचा आरोप करण्यात आलाय.  मॅटप्रॉप अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (एसडब्ल्यूडी) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम करण्यात आल्याचा तपासकर्त्यांचा अंदाज आहे.

डिनो मोरियाचं वर्क फ्रंट

डिनो मोरियाने 1999 मध्ये 'प्यार में कभी कभी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण 2002 मध्ये आलेल्या 'राझ' या चित्रपटाने त्याला यश मिळालं, ज्यामध्ये त्याने बिपाशा बसूसोबत काम केलं होतं. गेल्या काही वर्षांत, डिनोने हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील 50 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त, तो क्लॉकवाइज फिल्म्स या प्रॉडक्शन कंपनीचा सह-संस्थापक आहे. डिनो मोरिया अलीकडेच नेटफ्लिक्सच्या वेब सिरीज, द रॉयल्समध्ये दिसला. या महिन्याच्या सुरुवातीला ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nana Patekar On Vaishnavi Hagawane Case: 'दौलतजादा करणारी, व्यसनाधीन माणसं समाजाचा भाग, हे वास्तव'; वैष्णवी हगवणे प्रकरणावर नाना पाटेकर थेटच बोलले