729 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर टॉम क्रूझचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, पहिल्या दिवसाची कमाई ऐकून अवाक व्हाल
Mission Impossible The Final Reckoning Box Office Collection Day 1: टॉम क्रूझचा Mission Impossible हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून कमाईचे नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे.

Mission Impossible The Final Reckoning Box Office Collection Day 1 : टॉम क्रूझची प्रसिद्ध फिल्म सिरीज 'मिशन इम्पॉसिबल'चा (Mission Impossible) सातवा भाग, 'मिशन इम्पॉसिबल (Mission Impossible) डेड रेकनिंग पार्ट वन' 12 जुलै 2023 रोजी भारतात प्रदर्शित झाला. कोरोना महामारीनंतर अडचणींचा सामना करणाऱ्या भारतीय चित्रपटगृहांसाठी या चित्रपट महत्त्वपूर्ण ठरला होता. या सिनेमाने त्यावेळी 120 कोटी रुपये कमावले होते.
729 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर टॉम क्रूझचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
आता या सिरीजचा दुसरा भाग आणि फ्रँचायझीचा आठवा आणि शेवटचा भाग 729 दिवसांनी आज म्हणजेच 17 मे रोजी भारतात प्रदर्शित झाला आहे. 'मिशन इम्पॉसिबल द फायनल रेकनिंग' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो अमेरिकेच्या सहा दिवस आधी भारतात प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट 23 मे रोजी अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे. अर्थातच चित्रपटाच्या निर्मात्यांना भारतीय बॉक्स ऑफिसवर विश्वास आहे आणि हा विश्वास पहिल्या दिवशी खरा ठरताना दिसत आहे.
Mission Impossible ची पहिल्या दिवसाची कमाई ऐकून अवाक व्हाल
सैक्निल्क मते, मिशन इम्पॉसिबल: द फायनल रेकनिंगने भारतात 4:05 वाजेपर्यंत 8.14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सैक्निल्कवर उपलब्ध असलेला हा डेटा अंतिम नाही. यामध्ये बदल होऊ शकतात आणि आम्ही ते वेळोवेळी अपडेट करत राहू.
'मिशन इम्पॉसिबल 8' हा चित्रपट सर्वाधिक ओपनिंग देणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड मोडेल. या वर्षी प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या टॉप 3 चित्रपटांवर नजर टाकली तर, विकी कौशलच्या 'छवा'ने पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपये कमावले होते. दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा 'सिकंदर' हा सिनेमा होता. सलमानच्या या सिनेमाने 27.50 कोटी कमावले होते. तिसऱ्या क्रमांकावर अजय देवगणचा 'रेड 2' होता ज्याने पहिल्या दिवशी 19.71 कोटी रुपये कमावले. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अक्षय कुमारचा स्काय फोर्स (15.30 कोटी रुपये) आणि सनी देओलचा जाट (9.62 कोटी रुपये) आहे.
आता, टॉम क्रूझचा चित्रपट 'जाट' ला मागे टाकत आहे आणि पहिल्या दिवशी तो 'स्काय फोर्स' आणि 'रेड २' लाही मागे टाकेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, या चित्रपटाने अवघ्या काही तासांतच दीड डझनहून अधिक बॉलिवूड चित्रपटांचा पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचा विक्रम मोडला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या





















