Mirzapur 3 OTT Release Date: मिर्झापूर (Mirzapur 3) ही पंकज त्रिपाठी यांची वेब सिरिज अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. आतापर्यंत या सिरिजचे दोन सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. ज्यावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेमही केलं. त्यानंतर आता प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून त्याच्या तिसऱ्या सीझनची वाट पाहत आहेत. त्र निर्माते त्याची रिलीज डेट जाहीर करण्यास उशीर करत आहेत, त्यामुळे चाहते नाराज आहेत. आता अलीकडेच पंकज त्रिपाठी यांनी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर चाहत्यांनीच मालिकेच्या रिलीज तारखेचा अंदाज लावला आहे
'मिर्झापूर'चा पहिला सीझन 2018 मध्ये प्रसारित झाला होता. पहिल्या सीझन सुपरहिट झाला. त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला. 'मिर्झापूर 2' पासून चाहते तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. त्यातच आता पंकज त्रिपाठींनी या सिरिजविषयी पुन्हा एक मोठी हिंट दिल्याचं समोर आलं आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
प्राइम व्हिडिओने दिली हिंट
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, भौकाल मचने वाला है क्या? पंचायत सीझन 3 नंतर, प्राईमने चाहत्यांना आणखी एक मोठी भेट दिली आहे. प्राइम व्हिडिओने मिर्झापूर 3 ची देखील घोषणा केलीये. हे ऐकल्यानंतर हे ऐकल्यानंतर चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत. गुन्हेगारी आणि राजकारणाने भरलेल्या मिर्झापूर या वेबसिरीजचा तिसरा सीझन नवीन पात्र आणि नवीन कथेसह पाहायला मिळणार आहे. सीझन 3 कथा अधिक मनोरंजक बनवणार आहे.
चाहत्यांनी सांगितली रिलीजची तारीख
दरम्यान यामध्ये मिर्झापूरच्या पात्रांचा फोटो शेअर केलाय. त्यावर काही अक्षर केला सिक्वेन्समध्ये लिहिण्यात आली आहेत. त्यावर चाहत्यांनी या सिरिजच्या रिलीज डेटचा अंदाज लावला आहे. त्या फोटोवरुन त्यामध्ये MS3W असं लिहिलं असल्याचं लक्षात येतंय. याचाच अर्थ ही सिरिज सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रिलीज होणार असल्याचा अंदाज प्रेक्षक वर्तवत आहेत. रिपोर्ट्नुसार, सीझन 3 जुलैमध्ये रिलीज होऊ शकतो किंवा निर्माते ही सिरीज दसरा किंवा दिवाळीपर्यंत प्रदर्शित करू शकतात.पण चाहत्यांच्या मते मिर्झापूरचा तिसरा सीझन सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. मात्र, आता फक्त निर्मातेच शेवटची तारीख सांगतील की कालीन भैया कोणत्या दिवशी हाहाकार माजवणार आहे.
बीना भाभीने दिले 'मिर्झापूर-4' बद्दल संकेत
'मिर्झापूर'मध्ये कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठीची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री रसिका दुग्गलने सीरिजच्या चौथ्या सीझनबद्दल चाहत्यांना हिंट दिली आहे. 'मिर्झापूर'चा चौथा सीझन हा 'मिर्झापूर' मालिकेचा शेवटचा भाग असू शकतो.