Megha Ghadge Working With Ashok Saraf: मराठी विश्वातील (Marathi Film Industry) दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी केवळ मराठीत नाही तर, हिंदी सिनेसृष्टीतही उल्लेखनीय कामगिरी केली. अशोक सराफ यांनी उत्कृष्ट, अचूक आणि सखोल अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलंय. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी अनेक जण संधीचं सोनं करण्याची वाट पाहत असतात. कुणाचं नशीब चमकतं तर, कुणी अजूनही अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.  बऱ्याच कलाकारांनी आतापर्यंत अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. अलिकडेच मराठी अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) हिने मुलाखतीतून अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन शूट करत असतानाचा अनुभव तिने अलिकडेच दिलेल्या मुलाखतीतून शेअर केलाय.

Continues below advertisement

मेघा घाडगे हिने अलिकडेच राजश्री मराठीला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीतून तिने अनेक किस्से शेअर केले. तिने या मुलाखतीत कधीच विसरता येणार नाही, असा एक किस्सा शेअर केला आहे.   तो किस्सा नेमका कोणता? अशोक सराफ यांच्यासोबत रोमँटिक सीन करत असताना काय घडलं? जाणून  घेऊयात. दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत काम करत असतानाचा अनुभव शेअर करताना मेघा घाडगे म्हणाली की, 'अशोक मामांसोबत मला काम करता आलं, खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची एक सिरिअल होती, त्यांनी मला guest appearance म्हणून बोलवलं होतं'.

मेघा घाडगे हिने अशोक सराफ यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला (Megha Ghadge Working With Ashok Saraf in marathi serial)

'अशोक मामा आणि मी कपल म्हणून काम करणार होतो. म्हटले अरे बापरे, मी कसं काय हा सीन करु शकते. लावणी कलावंत म्हणून मला बोलवतात. मी त्या दिवशी अशोक सराफ यांना समोर बघितलं. मी स्वत:ला म्हटलं की, 'मेघा तू खूप मोठं पुण्य केलं आहेस, म्हणून अशा कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे'.  सीन करत असताना मला त्यांनी आधी,  'असं सीन करणार आहे मी, असं बोलणार आहे मी... मग तुझा डायलॉग आहे'.. असं करत 1,2,3,4 सर्व मु्द्दे सांगितले'.

Continues below advertisement

'तू लावणी कलावंत आहेस, तुला ज्या टोनमध्ये जमेल त्या टोनमध्ये तू बोल..., असं मला अशोक सराफ यांनी मला सांगितलं. निवेदिता ताई  माझ्या समोरच होत्या. निवेदित सराफ ग्रेटच आहेत. त्या काळातील दोघेही फार दिग्गज कलाकार आहेत.  त्यांच्यासमोर काम केलं, माझं काय झालं असेल? तो सीन अप्रतिम झाला. माझ्या आयुष्यात मी खूप मोठी मोठी माणसं पाहिली आहेत. बऱ्याच खूप मोठ्या गोष्टी केल्या. मला असं वाटतं की, प्रेक्षकांपर्यंत नीट या गोष्टी पोहोचल्या नाहीत', अशी खंत मेघा घाडगे हिने मुलाखतीतून व्यक्त केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Preity Zinta on Tukaram Mundhe: प्रिती झिंटाच्या टी - शर्टवर 'Team तुकाराम मुंढे', अभिनेत्री खरंच मुंढेंची फॅन? पापाराझींसमोर म्हणाली...