Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरातील 11 वा आठवडा चांगलाच वादळी ठरताना दिसतोय. नुकतंच बिग बॉसच्या घरात विशाल आणि राकेश एकमेकांना भेटल्याचं दिसलं. घटस्फोटाचा विषय काढत विशालने डिवचताच दोघांमध्येही झटपट झाल्याचं दिसलं. (Bigg Boss Marathi 6) दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. दोघांचा शाब्दिक वाद इतका टोकाला गेला की शेवटी बिग बॉसला मध्ये पडावं लागलं. दरम्यान, फिनालेच्या तोंडावर राकेश आणि विशालच्या राड्याची एकच चर्चा रंगली आहे. नॅशनल टेलिव्हिजनवर राकेशच्या घटस्फोटाचा मुद्दा बोलून दाखवल्यामुळे राकेश प्रचंड भडकला होता. यावर तू माझ्या वयावरून बोलतो ते पर्सनल नव्हतं का ? असा सवाल विशालने केला. या सगळ्या घटनेवर बिग बॉस मराठीचा पहिला पर्वाची विजेती मेघा धाडेने (Megha Dhade) अलीकडेच प्रतिक्रिया दिली आहे. राकेश आणि विशालच्या भांडणावर मेघाने विशालचा ढोंगीपणा बाहेर काढलाय.
काय म्हणाली मेघा धाडे ?
राकेश आणि विशालच्या राड्यावर बिग बॉस मराठीचा पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे म्हणाली ' विशाल तू तन्वी कोलतेच्या वयाबद्दल बोलला आहेस . राकेशलासुद्धा तू त्याच्या वयावरून बोलतोस. हे सगळं चालतं मग तुला वयावरून बोललं तर पर्सनल आहे का ? तू तुझ्या वयाबद्दल खोटं बोलला आहेस. स्वतः 25 वर्ष लहान मुलीला पटवायला जातोस तेही नॅशनल टेलिव्हिजनवर हे सगळं चालतं याला .... ढोंगीपणा " असं मेघा म्हणाली.
यावर सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरातील हा प्रोमोही प्रचंड व्हायरल होतोय.अनेकजण राकेशचं कौतुक करताना दिसतात तर काहीजण विशालला खडे बोल सुनावताना दिसत आहेत.
नेमकं घडलं काय बिग बॉसच्या घरात?
12 व्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कदरम्यान घरात मोठा वाद झाला. या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाचा फोटो टीव्हीवर दाखवला जातो आणि इतर सदस्यांना कोणाचा टीव्ही फोडायचा ते ठरवायचं असतं. या वेळी राकेश बापटने विशालला नॉमिनेट करत त्याचा टीव्ही फोडला. खाजगी आयुष्यावर बोलल्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याचं राकेशने सांगितलं. यावर विशाल संतापला आणि त्याने राकेशला घटस्फोटावरून टोमणा मारला. दोघांमध्ये वाद चिघळत गेला आणि ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच बिग बॉसने दोघांना शांत राहण्याचा इशारा दिला, तर घरातील इतर सदस्यांनी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला.
