Mayank Lohar Virar Local Train Case Actor Swapnil Rajshekhar Reaction: मुंबई (Mumbai News), अनेकजण इथे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. मुंबई लोकल (Mumbai Local) तर मुंबईची लाईफलाईन (Mumbai Lifeline)... पण कधी कुणी विचारही केला नसेल की, लाईफलाईन मानली जाणारी लोकल ट्रेन एका निष्पाप तरुणासाठी मृत्यूचा सापळा ठरेल. महाराष्ट्राची (Maharashtra News) राजधानी असलेल्या मुंबईतील एका लोकल ट्रेनमध्ये, पावसादरम्यान ट्रेनचा दरवाजा उघडा की बंद ठेवायचा? यावरून मोठा वाद झाला आणि याच वादातून एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली.

Continues below advertisement

धावत्या ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहार याची निर्घृणपणे भोसकून हत्या करण्यात आली. पावसाचे पाणी डब्यात उडत असल्याने ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून ही घटना घडली. त्याच्या मृत्यूमुळे विरारमधील लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे. अशातच आता याप्रकरणी मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते स्वप्नील राजशेखर नेमकं काय म्हणाले? (Swapnil Rajshekhar On Mayank Lohar Virar Local Train Case)

Continues below advertisement

स्वप्नील राजशेखर यांनी सोशल मीडियावर मयंक लोहारच्या मृत्यूप्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. 'रेल्वे डब्यात किमान शंभर लोक असतील... घटनेचे व्हिडीओ निघाले... पण कुणी मयंकला मदत केली नाही, की खुनी पकडला नाही… हे तितकचं गंभीर आहे…', असं स्वप्नील राजशेखर यांनी म्हटलं आहे.

स्वप्नील यांच्या पोस्टवर एका नेटकाऱ्यानं, "स्वप्नीलजी कदाचित त्या मुलाच्या जागी एखादी मुलगी असती तर हिरोगिरी दाखवायला काही जण पुढे आले असते!", अशी कमेंट केलीय. त्यावर उत्तर देत स्वप्नील राजशेखर म्हणाले की, "एक हत्यारबंद माथेफिरू एका मुलीवर बेभान चाकू हल्ला करत असताना एका धाडसी युवकानं पुढे होऊन त्याला हातातल्या सॅकने हाणायला सुरुवात केली… ते पाहुन बाकीचे पाचसहा बघे पुढे झाले... त्यांनी त्या हल्लेखोराला हाणलं, पुढच्यांनी वार करण्यापासून अडवलं अन् मग त्याला पकडून दिलं… अन् बहुदा त्या मुलीचा जीवही वाचला ही हल्लीची घटना प्रसिद्ध आहे… आणि माझा मुद्दा समजून घेणाऱ्याला इतपत पुरेसं आहे…", असं म्हटलंय.

"तो गुन्हेगार डब्यातुन उतरून गर्दीतुन सरळ चालत स्टेशनबाहेर गेला… मग तो त्याच्या इच्छित स्थळी पोहोचला. तिथून मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना 12 तासांनी पोलिसांनी त्याला शोधून पकडलं… पोलिसांनी तत्परता दाखवली नसती तर तो पळून सुद्धा गेला असता… बाकी हिरोगीरी राहू दे, पण ज्या रेल्वे डब्यातून हा खुनी बाहेर पडला त्या डब्यातल्या लोकांनी तो डब्याबाहेर पडल्यावर आरडाओरडा का केला नसेल? बाहेरच्या लोकांना का सांगितलं नाही की, 'तो खुनी चालला आहे, त्याला अडवा…' गदारोळ झाला असता तरी रेल्वे पोलिसांनी तिथेच त्याला पकडलं असतं… बाकी त्यांनी मयंकला मदत केली नाही, खुन्याला वार करताना अडवलं नाही, त्याला पकडलं नाही सगळं मान्य!! एवढंही का केलं नसेल ?!!!' असा सवालही स्वप्नील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...