Aishwarya Harishankar: सोशल मीडियावर एखादं गाणं ट्रेंडिंगला आलं की त्यातील कलाकारही क्षणार्धात चर्चेत येतात. सध्या ‘माझ्या सोन्या’ या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे आणि या गाण्यातील अभिनेत्री ऐश्वर्या हरिशंकर हिचीही जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनयासोबतच निर्मिती आणि डिजिटल कंटेंटच्या दुनियेतही तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे, ऐश्वर्याच्या सोशल मीडिया फॉलोअर्सचा आकडा 13 लाखांहून अधिक आहे. अनेक मोठ्या ब्रँड्ससोबत केलेलं काम आणि तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे ती सोशल मीडिया स्टार म्हणूनही लोकप्रिय आहे. पण ‘माझ्या सोन्या’मुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेली ही ऐश्वर्या हरिशंकर नेमकी आहे तरी कोण? तिचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास कसा आहे?

Continues below advertisement

गेल्या तीन वर्षांत ऐश्वर्याने मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक महत्त्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. 'लाल बिंदी', 'माझ्या सोन्या' आणि 'लिपस्टिक' या लोकप्रिय मराठी म्युझिक व्हिडिओंमधील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याचबरोबर मराठी चित्रपट 'आधार कार्ड'मध्ये तिने अभिनेत्री आणि निर्माती अशा दुहेरी भूमिका साकारत आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवली. हिंदीतील 'Band Aid' आणि 'Hide and Seek' या प्रोजेक्ट्समधूनही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. लवकरच तिचे अनेक मराठी रॅप म्युझिक अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Continues below advertisement

अभिनयाबरोबरच ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखली जाते. इन्स्टाग्रामवर तिचे 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून यूट्यूबवर 1.17 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. फॅशन, लाइफस्टाइल आणि मनोरंजनाशी संबंधित तिच्या कंटेंटला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. 

याच लोकप्रियतेमुळे Suta Bombay, Dabur Amla, Lakmé आणि Faces Canada यांसारख्या नामांकित ब्रँड्ससोबत तिने यशस्वी सहकार्य केलं आहे. त्यामुळे डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणूनही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.