Marathi Singer: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक कलाकार लग्न करत आहेत. अनेक जण लग्नाच्या तयारीत आहेत. अलीकडेच साक्षी महाजन आणि अथर्व कर्वे यांनी लग्न करत आयुष्याच्या नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. त्यांच्यापाठोपाठ आता मराठमोळी गायिकाही आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू करत आहे. 'गोव्याच्या किनाऱ्यावर' या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली गायिका शुभांगी केदारचा (Shubhangi Kedar) नुकताच विवाह सोहळा पार पडला. तिने सोशल मीडियावर तिचे आणि तिच्या नवऱ्याचे फोटोही शेअर केले आहेत. पारंपरिक थाटात सुंदर लोकेशनवर या दोघांनी लग्न केलंय. त्यांच्या लूकसह त्यांच्या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Continues below advertisement

कोण आहे शुभांगी केदारचा नवरा?

शुभांगी केदारने तिच्या सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची चर्चा होती.  शुभांगीने तिच्या बॉयफ्रेंड बरोबर लग्न केलं आहे. अनेक दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. प्रणित वनवे असं शुभांगीच्या नवऱ्याचं नाव आहे. शुभांगी केदार चा नवरा प्रणित वानवे देखील क्रिएटिव क्षेत्रातला आहे. कलाकार आहे. क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून तो काम करतो. शुभांगीच्या अनेक म्युझिक अल्बममध्ये त्याने मदत केलीय. 

 

Continues below advertisement

शुभांगी केदारही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. अनेक जुनी मराठी गाणी हिंदी गाणी ट्रेडिंग इंग्लिश गाणी तसेच स्वतः लिहिलेली गाणी ती गात असते. अनेक सिनेमांसाठी ही शुभांगी ना गाणी गायली आहेत. ती शास्त्रीय संगीतही शिकते आहे. गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्यातून शुभांगी घराघरात पोहोचली. तुझ्या नजरेच्या जाल्यामंदी कालीज गुतलं आज.. असं म्हणत सगळ्यांची मन जिंकणारी शुभांगी केदार नुकतीच लग्न बंधनात अडकले आहे.

शुभांगीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या खास दिवशी तिने पारंपरिक मराठमोळा साज केला होता. नऊवारी साडीत ती अतिशय देखणी दिसत होती. तर तिच्या पतीने धोतर परिधान करून पारंपरिक लूक पूर्ण केला होता. त्यांचा विवाह विधीपूर्वक आणि पारंपरिक रीतीरिवाजांनुसार पार पडला.  एका व्हिडीओमध्ये तिच्या लग्नातील खास लूकची झलक पाहायला मिळत असून चाहत्यांकडून त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.