Marathi Play Carry On Spying Renamed to Hergiri Chalu Aahe: ओटीटीच्या जगतात आजही नाटक आवर्जून पाहिले जातात. नाटकाचा (Marathi Play) चाहतावर्ग खूप मोठा आहे. सध्या मराठीतील 'कॅरी ऑन स्पाईंग' या नाटकाची प्रचंड चर्चा होत आहे. अशातच या नाटकाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. या नाटकाचं नाव बदलण्यात आलं आहे. 'हेरगिरी चालू आहे', असे नव्या नाटकाला नाव देण्यात आलं आहे. प्रसिद्ध ऍड गुरु, इंग्रजी, हिंदी, गुजराती रंगभूमीवर नाटकांचे विविध ट्रेंड रुजवणारे भरत दाभोळकर यांनी मराठीतही पाऊल ठेवलं आहे. त्यांचं पहिल्यांदाच मराठीमध्ये एक नवं कोरं नाटक रंगभूमीवर दाखल झालं आहे. 

Continues below advertisement

दाभोळकरांकडून नाटकाचं विशेष - हटके प्रोमोशन (Bharat Dabholkars First Marathi Play)

या नाटकात मोठा बदल करण्यात आला आहे. या नाटकाचं पूर्वीचं नाव बदलून आता नवीन मराठमोळं नाव  आणि नाटकाला नवं रुप देण्यात आलं आहे. या बदलाची घोषणा करण्यासाठी भरत दाभोळकरांनी अनोख्या पद्धतीने केली. आपल्या स्वतःच्या मालकीच्या रिक्षेवर त्या नाटकाचे पोस्टर लावून विलेपार्ल्यामध्ये ही रिक्षा फिरवली. तसेच नाटकाच्या नव्या नावाचं प्रोमोशन केलं. तसेच त्याच रिक्षेने ते विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग करायला दाखलही झाले. दरम्यान, दाभोळकरांनी केलेल्या नाटकाच्या प्रोमोशनचं विशेष कौतुक होत आहे. 

'कॅरी ऑन स्पाईंग' या नाटकाचं नाव बदलण्यात आलं (Bharat Dabholkar first Marathi play Hergiri Chalu Aahe)

नुकतंच रंगभूमीवर दाखल झालेल्या 'कॅरी ऑन स्पाईंग' या दाभोळकरांच्या नव्या नाटकाचं नाव 'हेरगिरी चालू आहे' असं बदलण्यात आलं आहे. मराठी थिएटरमधील काही प्रसिद्ध कलाकार या नाटकात काम करत आहे. नाटकाचे ७ प्रयोगही झाले आहेत. 'सवाईगंधर्व' निर्मित आणि 'अभिजात' प्रकाशित या नाटकाची निर्मिती तरुण निर्माता आकाश भडसावळे  यांनी केले असून, या संस्थांचं हे सातवं नाटक असल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

मराठी प्रेक्षकांसाठी पूर्णता नवीन असा - 'ब्लॅक ह्युमर' असलेलं हे नाटक निर्मित आणण्याचं धाडस आकाशने केलं आहे. या निमित्ताने लेखक आणि दिग्दर्शक भरत दाभोळकर आणि अभिनेते मोहन आझाद यांनी प्रथमच मराठी रंगभूमीवर पदार्पण केलंय. त्यांच्या अनोख्या शैलीतील हे नाटक मराठी रसिकांना एक अनोखी पर्वणी ठरेल. 

 दरम्यान, नाटकाच्या टीमला असा विश्वास आहे की, देशोदेशीच्या विविध कलांना स्वीकारणारा मराठी प्रेक्षक या वेगळ्या आणि नवीन जॉनरच्या नाटकाचाही स्वीकार करेल. अर्थात हे वेगळेपण पाहायला नाट्यगृहात एकदा तरी जाऊन हे नाटक पाहायलाच पाहिजे. कारण की, नाट्यगृहात आता 'हेरगिरी चालू आहे'.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बाबा आयुष्य संपवतील...; रणबीरच्या बहिणीने का नाकारलं ग्लॅमर जग? धक्कादायक खुलासा करत वयाच्या 45 व्या वर्षी केला डेब्यू