Marathi Natak Shantecha karta Chalu Aahe: मराठी रंगभूमीवर गाजलेलं विनोदी नाटक 'शांतच कार्ट चालू आहे' (Shantecha Karta Chalu Aahe) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 1983 साली रंगभूमीवर आलेल्या या नाटकाने त्या काळात मोठं यश मिळवलं होतं . लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, नयनतारा आणि लाली जोग यांच्या अभिनयामुळे हे नाटक विशेष गाजलेलं. पण covid काळात थांबलेलं हे नाटक 217 प्रयोगांनंतर पुन्हा नव्या जोमात सादर केलं जात आहे. नुकताच 11 एप्रिल रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात या नाटकाचा प्रयोग झाला. या प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान, अभिनेता प्रियदर्शन जाधवने (Priyadarshan Jadhav) देव्हाऱ्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो ठेवत एक खास पोस्ट केलीये. 'लक्ष्मीकांत बेर्डे सर लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावरसुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतीच कार्ट चालूच राहील अशी आशा बाळगतो' असं त्याने लिहिले आहे. या पोस्टची सध्या चर्चा रंगलीय.
काय म्हणाला प्रियदर्शन ?
"१९८३ साली शांतेचं कार्ट चालू आहे हे नाटक रंगभूमीवर आलं आणि अक्षरशः धुमाकूळ घातला या नाटकाने. लक्ष्मीकांत बेर्डे सुधीर जोशी नयनतारा लाली जोग यांनी त्यांच्या भूमिका अजरामर करून ठेवल्या. नाटक तुफान गाजले. श्रीनिवास भणगे लिखित आणि " प्रकाश बुद्धीसागर " दिग्दर्शित हे नाटक सुपरहिट ठरलं. बुद्धीसागर काय कमाल करू शकतात ह्या नाटकाने सिद्ध झालं आणि पुढे त्यांनी अनेक सुपरहिट नाटके दिग्दर्शित केली. आज त्याच नाटकाचा नव्याने प्रयोग होत आहे. 217 प्रयोग केल्यानंतर कोविड मुळे नाटक बंद पडले. आता नाटक पुन्हा नव्या दमाने सुरू होत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे इतकं धमाकेदार काम मला करताच येणार नाही पण तरीही जमेल तेवढं उत्तम करायचा प्रयत्न करेन. #लक्ष्मीकांत बेर्डे सर.... लक्ष असू द्या ! तुमच्यासारखेच आमच्यावर सुद्धा प्रेक्षक प्रेम करतील आणि शांतेच कार्ट "चालूच" राहील अशी आशा बाळगतो. बाकी................. मजेत !"प्रेक्षकांना नम्र विनंती : खळखळून हसायचं असेल..... तर कार्ट चालूच आहे !
कुटुंबातील छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून उलगडणारे नातेसंबंध, त्यातील गंमती-जंमती, गैरसमज आणि आपुलकी यांचा हलकाफुलका वेध या नाटकातून घेतला जातो. त्यामुळेच हे नाटक प्रेक्षकांना हसवतानाच आपलंसंही वाटतं. पूर्णपणे कौटुंबिक स्वरूपाचं असल्यामुळे, हे नाटक सगळ्यांनी एकत्र बसून पाहाण्यासारखं आहे.
