अशी ही बनवाबनवी सिनेमा पाहिला नाही असा माणून आज शोधू सापडणार नाही. म्हणूनच आज तब्बल बत्तीस वर्षे होऊनही सचिन पिळगांवकर दिग्दर्शित या चित्रपटावर.. यातल्या व्यक्तिरेखांवर मिम्स बनतात. यातल्या सर्वच व्यक्तिरेखांवर मराठी रसिकांनी उदंड प्रेम केलं. या सिनेमावर बरंच काही यापूर्वी लिहून आलं आहे. पण एक गंमत आता आम्ही सांगणार आहोत. ही बनवाबनवी आहे कमळीची. तीच कमळी जी परश्याची प्रेमिका होती.


या सिनेमाच्या सगळ्या व्यक्तिरेखा गाजल्या. सुधीर-मनीषा, धनंजय-माधुरी, शंतनू-सुषमा, सरपोतदार असे सगळे गाजले. अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर, विजू खोटे, सुधीर जोशी, प्रिया बेर्डे अशी सगळी सगळी मंडळी गाजली. या सिनेमाने एक जोडी पहिल्यांदा लोकांसमोर आणली ती होती परश्या आणि कमळीची. अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे आणि आत्ताच्या प्रिया बेर्डे यांची. ही जोडी पुढे खूप गाजली. त्यानंतर ही रील लाईफ जोडी रिअल लाईफ बनली. अनेकांना माहीत नसेल पण यातल्या कमळीचा म्हणजेच प्रिया बेर्डे यांचा हा पहिलाच सिनेमा होता. या सिनेमावेळी त्या होत्या केवळ 16 वर्षाच्या. म्हणजे चित्रपटाचं शूट झालं तेव्हा त्या 16 वर्षाच्या होत्या. आणि सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा दोन वर्षे गेली होती आणि उजाडलं होतं 88 साल.


अभिनेता सुबोध भावेचा ट्विटरला रामराम!


या सिनेमात सगळे ज्याचे त्याचे आवाज आहेत. म्हणजे प्रत्येक कलाकाराने आपआपलं डबिंग या सिनेमात केलं आहे. अपवाद केवळ एका व्यक्तीचा ती म्हणजे कमळी उर्फ प्रिया बेर्डे. या सिनेमात त्यांचा अभिनय दिसत असला तरी त्यांच्या संवादांतून ऐकू येणारा आवाज त्यांचा नाहीय. तो डब केला आहे. शुभांगी रावते या डबिंग आर्टिस्टने, त्यावेळी हा आवाज डब केला होता. कारण, सिनेमाचा क्लायमॅक्स काही कारणाने पुन्हा शूट करावा लागला. पण त्यावेळी प्रिया आपल्या ठरलेल्या नाटकांच्या दौऱ्यांवर होत्या. त्यामुळे डबिंगच्या तारखा मिळेनात. अशावेळी दुसरा पर्याय नव्हता. मग त्यांचं डबिंग करून घ्यावं लागलं. आपल्याला वाटत जरी असलं तरी कमळीनं आपल्याला आपल्या आवाजात बनवलं ते असं.


बनवाबनवीने अनेक गोष्टी कशा असाव्यात हे सांगितलं. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो सुधाचा. सुधीरनंतर सुधा बनतो हे सगळ्यांना माहीत आहेच. पण कमाल सौंदर्यदृष्टी ठेवून यात सुधा चितारली गेली. बाकी धनंजय माने, सरपोतदार, परश्या आदींनी आपल्या संवादांतून धुमाकूळ घातला आहेच. अशी ही बनवाबनवी हा त्या अर्थाने एव्हरग्रीन चित्रपट ठरला.


Nivedita Saraf | प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, प्रकृती स्थिर असल्यानं होम क्वारंटाइन