Kedar Shinde on Swami Samarth Movie: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आपल्या चित्रपटांसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत बऱ्याच सिनेमांचे दिग्दर्शन (Marathi Director) केलं आहे. त्यांच्या सिनेमांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. ' जत्रा', 'बाईपण भारी देवा', 'अगं बाई अरेच्चा' यांसारख्या हिट सिनेमांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. आता त्यांचा आगामी 'गणा धाव रे' (Gana Dhav Re) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिनेमात भारत जाधव, प्रणाली घोगरे यांसह इतर दिग्गज कलाकारांची फौज पहायला मिळत आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी सध्या केदार शिंदे आणि त्यांची टीम व्यस्त आहे. अशातच केदार शिंदे यांनी एका मुलाखतीत, श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) यांच्यावर आधारीत सिनेमा बनवण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

स्वामींवर चित्रपट काढून व्यवसाय करणार नाही, केदार शिंदे नेमकं काय म्हणाले?

केदार शिंदे यांनी अलीकडेच सकाळ प्रीमियरला मुलाखत दिली होती. श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित सिनेमा बनवण्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले की, 'मला कित्येक जण विचारतात... मी श्री स्वामी समर्थ यांचा मोठा भक्त आहे तर, मी सिनेमा का करत नाही? मला असं वाटतं की मी त्यांचा व्यवसाय नाही करू शकत', असं केदार शिंदे म्हणाले.  'प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी नाही त्या विचारांचा भाग होऊ शकत '.

'शेवटी सिनेमा करणं हा माझ्या व्यवसायाचा भाग झाला. मी इतर असंख्य विषय करेन. मी रोज स्वामींचे नामस्मरण करेन. मी त्यांची पोथी वाचतो, सगळं करतो. पण त्यांच्यावर आधारित सिनेमा तयार करून मी व्यवसाय नाही करू शकत', असं केदार शिंदे मुलाखतीत म्हणाले. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचं वर्षाव होत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित 'गणा धाव रे' हा सिनेमा 27 नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज झाला असून, या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या:

महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल